Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर रिक्षा-टॅव्हल्सचा भीषण अपघात; ४ ठार तर सुमारे १० जखमी
Top News

राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर रिक्षा-टॅव्हल्सचा भीषण अपघात; ४ ठार तर सुमारे १० जखमी

Rahuri Shani Shingnapur road accident

Rahuri Shani Shingnapur road accident : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीशनिशिंगणापूर रस्त्यावर आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि तीनचाकी रिक्षा यांच्यात झालेल्या जोराच्या धडकेत रिक्षामधील तब्बल चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० हुन अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा  – 5 हजारांची लाच मागणारे मुख्याध्यापिका ACBच्या जाळ्यात; गुन्हा दाखल

शनिशिंगणापूर रस्त्यावरील उंबरे गावानजीक असलेल्या तांबे पेट्रोल पंपासमोर शनिशिंगणापूर कडून राहुरी कडे चाललेल्या ट्रॅव्हल्स गाडीने तीन चाकी प्रवासी रिक्षाला समोरासमोर जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा जागीच चक्काचूर झाली असून ट्रॅव्हल्स देखील बाजूला जाऊन पलटी झाल्याने रिक्षामधील प्रवाशांचा मृत्यू झाला तर ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts