• Home
  • महाराष्ट्र
  • 5 हजारांची लाच मागणारे मुख्याध्यापिका ACBच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
Top News

5 हजारांची लाच मागणारे मुख्याध्यापिका ACBच्या जाळ्यात; गुन्हा दाखल

ACB officials trap headmistress demanding bribe of Rs 5,000

Headmistress bribery case ACB : सेवा प्रगती योजने अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या थकीत लाभाचे बिल काढून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुका अंतर्गत येणाऱ्या सखरीटोला गावातील श्री विद्या गर्ल्स हायस्कूल येथील मुख्याध्यापिका व शाळेतील परिचर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

काय आहे प्रकरण

या प्रकरणात तक्रारदार हे १ जून १९९७ पासून सदर शाळेत परिचर म्हणून कार्यरत होते. त्यांना १ जानेवारी २०२४ पासून सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आलाहोता. प्रत्यक्षात हा लाभ मे २०२५ पासून पगारात लागू झाला. मात्र जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या १६ महिन्यांच्या फरकाची थकीत रक्कम मिळवण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती अजया जागेश्वर चूटे (वय ४३, वर्ग-२ अधिकारी) यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यातील २ हजार रुपये आरोपी देवराज अनंतराम चिंधालोरे (वय ५८, परिचर, वर्ग-४) यांच्यामार्फत स्वीकारण्यात आले होते, तर उर्वरित ३ हजार रुपये पगार झाल्यावर देण्यास सांगण्यात आले होते.

हे ही वाचा : दिल्ली दंगली प्रकरणात शरजील इमाम आणि उमर खालिदला मोठा धक्का; मात्र सर्वोच्च न्यायालयानं 5 आरोपींना दिला जामीन

तक्रार दाखल

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे दोन पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान आरोपी देवराज अनंतराम चिंधालोरे यांनी आरोपी श्रीमती अजया जागेश्वर चूटे यांच्या सांगण्यावरून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारली.

रक्कम आणि मोबाईल जप्त

या कारवाईत दोन्ही आरोपींनी आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान आरोपी श्रीमती अजया जागेश्वर चूटे यांच्या ताब्यातून ३ हजार रुपये लाच रक्कम जप्त करण्यात आली. तसेच आरोपी श्रीमती अजया जागेश्वर चूटे यांच्या कडून विवो कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे ५ हजार रुपये) व आरोपी देवराज अनंतराम चिंधालोरे कडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे १ हजार रुपये) जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts