Uddhav Raj Thackeray alliance : काल सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.त्यानुषणगने 15 जानेवारीला निवडणूक होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. त्यानुषंगाने आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भुवया उंचावल्या आहे. दोघेही काय करणार याकडे लक्ष लागून असून याबाबत आता संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आज संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : निवडणुकींचे बिगूल वाजलं! २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर, १६ ला मतमोजणी
सोमवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून त्याच्या तारखा जाहीर झाल्या आहे. अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील. परंतु, ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई असेल. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला हवे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागले आहेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नसून एका रात्रीत हे पोस्टर सरकारने काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आहे तर सरकारच्या लोकांना काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शासनाचे आदेश काढण्याची प्रक्रिया सुरु होती. तसेच निधी संदर्भात नगर विकास खात्याचे आदेश देखील निघत होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने चार वाजता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा आचारसंहितेचा भंग नाहीये का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. यापुढे ते म्हणाले कि, तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत असून या निवडणुकीत पैशाचे वाटप भरपूर होणार आहे. निवडणूक आयोग नक्की सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखांवर थांबेल. असा ही सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
या प्रमुख महापालिकेमध्ये एकत्र लढणार
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले. त्यावेळी ते म्हणाले कि, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की, आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. आम्ही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये एकत्र लढणार आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील.
मुख्य लढाई मुंबईची
ही मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई देखील मुंबईचीच होती. आम्ही मराठी लोकं पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार असून ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. असं संजय राऊत यांनी सांगितले. तर या महाराष्ट्राला माहित आहे की, रहमान डकैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची, त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत. मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केले आहे हे अख्या मुंबईला माहित आहे, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केला.












