बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. परंतु यंदाचा अर्थसंकल्प कोन सादर करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार होते. परंतु आता ही जबाबदारी कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्पाची जबाबदारी मुख्यमंत्रीच पार पाडण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात महत्वाच्या आर्थिक धोरणांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पार पाडतील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर येणाऱ्या अर्थसंकल्पात विकासाच्या मुद्यासोबतच सामाजिक, कृषी, औद्योगिक आणि रोजगार संभंधित कोणकोणत्या घोषणा करण्यात येतील यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे ही वाचा : अजितदादा बारामतीच्या मातीत विसावले, दादा अनंतात विलीन, अवघा महाराष्ट्र हळहळला
23 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबाबत सध्या तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे.
एक महिना अर्थसंकल्प सादर होण्यासाठी उपलब्ध असून सर्वत्र प्रशाकीय पातळीवर प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. विविध विभागाकडून आवश्यक माहिती आणि प्रस्ताव संकलित करण्यात येत असून अजित पवार यांच्या अकाली निधनाने अर्थसंकल्पीय प्रक्रियेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता राज्य शासन ही परिस्थिती सक्षमरित्या सांभाळू शकेल असा विश्वास अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.












