Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • दिल्लीचा ‘श्वास’ परत मिळवण्याचे प्रयत्न! पीयूसीशिवाय पेट्रोल नाही, जुन्या वाहनांना प्रवेश बंदी
Top News

दिल्लीचा ‘श्वास’ परत मिळवण्याचे प्रयत्न! पीयूसीशिवाय पेट्रोल नाही, जुन्या वाहनांना प्रवेश बंदी

delhi breathe air pollution

Delhi pollution control measures: दिल्लीतील विषारी हवेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनानं उपाययोजना सुरु केल्या आहेत. दिल्लीतील बहुतेक भागात AQI 400 ओलांडल्यानंतर ग्रेप IV उपाययोजना लागू करण्यात आल्या. इतर कडक उपाययोजना देखील लागू करण्यात आल्या आहेत. हवामानामुळं, पुढील आठवडाभर दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रशासन हवा स्वच्छ करण्यासाठी कठोर उपाययोजना करत आहे. गुरुवारी सकाळी नजफगड परिसरात विषारी धुक्याचा थर दिसून आला. येथील AQI 284 होता. दरम्यान, जवाहरलाल नेहरु स्टेडियमजवळील AQI 349 होता, जो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं खूपच खराब मानला आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशननं ग्रेप IV अंतर्गत सर्व कारवाई सुरु केल्या आहेत.

दिल्लीची हवा स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय :

आता, दिल्लीत कोणत्याही वाहनाला पीयूसीशिवाय पेट्रोल किंवा डिझेल मिळू शकणार नाही. दिल्लीमध्ये वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन मालकाकडे प्रदूषण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. शहराबाहेरुन फक्त BS-VI वाहनं आणि इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक सेवांमध्ये सहभागी असलेल्या ट्रक वगळता सर्व ट्रकना दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये 50% प्रवाशांसाठी घरुन काम करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर्व बांधकाम कामांवर बंदी घालण्यात आली आहे. कामगारांना 10,000 रुपये भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

 

सर्वोच्च न्यायालयानं टोल प्लाझा बंद करण्याचा विचार करण्यास सांगितलं :

प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सीमेवरील नऊ टोल प्लाझा तात्पुरते बंद करण्याचा विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सरकारला सांगितलं आहे. दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणाच्या गंभीर पातळीबद्दल चिंता व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी अनेक मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. न्यायालयानं एनएचएआय आणि एमसीडीला सांगितलं की प्रदूषण आणि वाहतूक कमी करण्यासाठी नऊ टोल प्लाझा बंद केले जाऊ शकतात.

हे ही वाचा :दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्यामुळं वेग मंदावला; विमानं आणि रेल्वे उशिरानं, वेळापत्रक विस्कळीत

दिल्लीमध्ये कडकपणा वाढला :

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळं आता कडकपणा वाढवला गेला आहे. बीएस-VI पेक्षा कमी वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जात नाही. दिल्लीच्या सर्व प्रवेश बिंदूंवर, दिल्ली पोलीस बीएस-4 असलेल्या वाहनांना परत पाठवत आहेत. अनेक ट्रक परत पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनाची स्थिती मशीनद्वारे तपासली जात आहे. यामुळं सकाळी खूप वाहतूक असते. पालम येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता सुमारे 100 मीटर आहे. मात्र, दृश्यमानता हळूहळू सुधारण्याची अपेक्षा आहे. दिल्लीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, प्रदूषणामुळं राजधानी दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. दिल्लीचा एकूण AQI 439 आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts