• Home
  • क्रीडा
  • उपकर्णधार स्मृती मंधानाने लग्न मोडल्यानंतर इंस्टाग्राम वर केली पहिली पोस्ट
Top News

उपकर्णधार स्मृती मंधानाने लग्न मोडल्यानंतर इंस्टाग्राम वर केली पहिली पोस्ट

ndian cricketer Smriti Mandhana shares her first Instagram post after her marriage breakup, looking emotional yet confident

Smriti Mandhana first post  : उपकर्णधार स्मृती मंधाना 23 नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल सोबत लग्न करणार होती. परंतु स्मृतीच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पालाश ने स्मृती मंधानाला धोका दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक वृत्त समोर आले. परंतु पलाश आणि स्मृती मंधाना यांनी याबाबत अधिकृत वक्तव्य केले नाही. आता 12 दिवसांनी स्मृती मंधानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

काय होती पोस्ट

सोशल मीडियावर स्मृती मंधाना यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लग्नाबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु तिने वनडे वर्ल्ड कप फायनलमधील अनुभवांबाबत भाष्य करताना दिसत आहे. टीम इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. गेल्या 12 वर्ष मिळालेल्या अपयशानंतर आपण कधी वर्ल्डकप जिंकू शकतो का? याबाबत तिला या व्हिडीओ मध्ये विचारण्यात आले.

हे ही वाचा : स्मृति मांधानाचा मी आदर करते; पलाशचा चेहरा समोर आणायचा होता.. मेरी डीकॉस्टाचे वक्तव्य

काय म्हणाली स्मृती

 

या पोस्ट मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम सामन्यातील आठवणींना उजाळा देण्यात आला. टीममधील खेळाडू गरजेनुसार कामगिरी करत होते. त्यामुळे बॅटिंग दरम्यान काही विचार करण्याची गरज नव्हती. मात्र मी फिल्डिंग दरम्यान देवाचं नामस्मरण करत होते, असा अनुभव स्मृतीने सांगितला.

या कारणाने झाले नाही लग्न

23 नोव्हेंबर रोजी सांगलीच्या समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊसवर स्मृती व पलाश यांचा विवाह सोहळ्याची तयारी सुरु असताना स्मृती मंधानाचे वडिल श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तात्काळ सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल आलं. तसंच रुग्णालयामध्ये स्मृती मंधाना व कुटुंबीयही दाखल झाले होते. या घटनेनंतर लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचें सांगितले होते. त्यानंतर पलाश मुछ कोरिओग्राफरसोबत काही तास गायब झाल्याचे वृत्त समोर आले होते. यावर स्मृती मंधाना ने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts