Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • या कारणाने हिवाळ्यात केस पडतात कोरडे; या उपायांनी तुमचे केस दिसतील चमकदार आणि मऊ
लाईफस्टाईल

या कारणाने हिवाळ्यात केस पडतात कोरडे; या उपायांनी तुमचे केस दिसतील चमकदार आणि मऊ

Dry and falling hair during winter with remedies for shiny and soft hair

winter hair fall remedies : हिवाळा म्हंटल कि फक्त थंडी नाही तर बॉडी, स्किन, केस या सर्वच गोष्टींसाठी एक आव्हान आहे. कारण हिवाळ्यात केस कोरडे होणे, चेहरा फुटणे, शरीर डिहायड्रेट होणे यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. चेहऱ्याला ग्लोइंग ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. हवेतील आद्रता, प्रदूषण, थंड हवा या सर्वच गोष्टींमुळे आपले केस अचानक कोरडे पडायला लागतात. आणि फ्रिझी दिसून येतात. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागतोय का ? मग काळजी करू नका. या हिवाळ्यात तुमचे केस मऊ, चमकदार आणि आणि फिझिनेस फ्री कसे ठेवायचे यावर आपण प्रभावी उपाय पाहणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला योग्य उपाय करता येतील.

हिवाळ्यात केस कोरडे होण्याचे कारणे

frizzi hair

हिवाळ्यात केस कोरडे का होतात ? तुम्हाला माहिती आहे का ? यामागे अनेक करणे आहेत. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने वातावरणातील नमी कमी होते. आणि यामुळे केस कोरडे दिसतात. कारण या केसांना नरिशमेंट मिळत नाही. हिवाळ्यात आपण गरम पाण्याचा वापर करून केस धुतो. परंतु हे गरम पाणी देखील आपल्या केसांना हानी पोहोचवतं. गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होते. आणि केस कोरडे दिसतात. एवढेच नाही तर पार्लर किंवा तुम्ही घरी वापरणारे हीटिंग टूल्स देखील केस कोरडे होण्यासाठी कारणीभूत आहे.

हे ही वाचा : हिवाळ्यात व्यायाम करताना घ्या ही काळजी; हा व्यायाम ठरेल फायदेशीर

हेअर शाम्पू आणि नैसर्गिक तेल

hair shampoo

हिवाळ्यात केस फ्रिझी किंवा कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. जसे कि हिवाळ्यात माईल्ड शॅम्पूचा वापर करणे. जो कि सल्फेट फ्री असेल. हेअर वॉश केल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. याशिवाय आठवड्यात किमान एकदा तरी डीप कंडिशनिंग मास्क चा वापर करा. तुम्ही हिवाळ्यात केसांना नैसर्गिक तेल लावू शकतात. जसे कि, नारळ तेल, आर्गन तेल, बदाम तेल, ऑलिव्ह तेल हे तेल केसांची आद्रता टिकवण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही हिलाव्यात रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपल्यास केसांना वेगळीच चमक येईल.

हीटिंग टूल्स

heating tools

केस धुतल्यानंतर ते कोरडे करून हलक्या हाताने कोरडे करा. म्हणजेच केस धुतल्यानंतर हेअर ड्रायर न वापरता नैसर्गिकरित्या केस सुकवा. केस सुकवण्यासाठी आपण जेव्हा हीटिंग साधने वापरतो तेव्हा आपले केस हिट होतात. त्यामुळे केस ड्राय होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. त्यामुळे तुम्ही स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयरन कमी प्रमाणात वापरून तुमचे केस ड्राय होण्यापासून वाचवू शकतात.

आतून पोषण महत्वाचे

natural oil

केसांचे सौदर्य वाढवण्यासाठी बाहेरूनच नाही तर आतून म्हणजे शरीरातून पोषण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही प्रोटीन, व्हिटॅमिन B , व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त आहार घेऊ शकतात. दिवसभर पुरेसे पाणी प्या. हिवाळ्यात आपण जास्त पाणी पिणे टाळतो. परंतु असे केल्यानेच केस कोरडे आणि फ्रिझी होतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

तुमच्या निरोगी केसांसाठी महिन्यातून एकदा प्रोटीन ट्रीटमेंट किंवा हायड्रेशन मास्क घ्या. जेणेकरून केसांचा कोरडेपणा कमी होईल. हिवाळ्यामध्ये केस कोरडे होणे हे सर्वसाधारन आहे. परंतु तुम्ही योग्य ती काळजी घेऊन केस मऊ चमकदार आणि निरोगी ठेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts