Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुण्यात भाजप अन् काँग्रेसला आंदोलन भोवलं! दगडफेक, राडा, गोंधळ प्रकरणी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल
Pune

पुण्यात भाजप अन् काँग्रेसला आंदोलन भोवलं! दगडफेक, राडा, गोंधळ प्रकरणी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

Cases filed against each other

Cases filed against each other : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयी करण्यात आलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण राज्यात काँग्रेस विरूद्ध भाजप असा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे. काल पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दगडफेक आणि घोषणाबाजीचा प्रकार घडला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याने हे प्रकरणी दोन्ही पक्षाला चांगलेच भोवलं आहे.

हेही वाचा – हिंदूच्या पवित्र महाशिवरात्री दिवशी गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह 100 जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर, काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपने आंदोलन केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केलं. भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही मैदानात उतरले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपकडून दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झालेत. तर महिला पोलीस कर्मचारीही या राड्यादरम्यान जखमी झाल्याची माहिती आहे.

पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर काही वेळानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात पोलिसांना यश आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत फिर्याद दिली. घाटे यांच्या या फिर्यादीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts