Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • एकामागून एक 3 सिलिंडर फुटले, भीषण स्फोटाने तीन मजली घर हादरले, 3 जण गंभीर जखमी
Top News

एकामागून एक 3 सिलिंडर फुटले, भीषण स्फोटाने तीन मजली घर हादरले, 3 जण गंभीर जखमी

Chandigarh 3 Cylinder Blast | चंदीगडमध्ये (Chandigarh) एक धक्कादायक घटना घडली आहे. चंदीगडमधील बुराईल गावात तीन सिलिंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्याची घटना घडली आहे. बुराईल गावातील एका घरात एकामागून एक अशा तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. हे स्फोट इतके भीषण आणि शक्तिशाली होते की एक तीन मजली घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेनं बुराईल गावात एकच खळबळ उडाली असून तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – “आजारापेक्षा उपचार भयंकर,पोलीस प्रशासनाला नेमकं काय सिद्ध करायचंय…”, जमावबंदीवरून सुप्रिया सुळे संतापल्या, थेट केला खरमरीत सवाल

चंदीगड सिलिंडर स्फोटाने हादरले, नेमंक घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बुराईल गावात एका घरात लागोपाठ तीन सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. एकामागून एक सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आख्खं तीन मजली घर जागीच हादरले आणि या घटनेत त्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीन जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात स्फोट झाला तिथे अंदाजे 15 गॅस सिलिंडर ठेवलेले होते. संबंधित घरात गॅस सिलिंडरचा अवैध काळाबाजार चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर गॅस गळतीनंतर हे स्फोट झाले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दालचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. तर अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर या स्फोटात घराच्या भिती हादरून कोसळल्या होत्या, त्यामुळे ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. तर मोठ्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पीडितांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण स्फोटामुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलिंडरचे झालेले हे स्फोट इतके शक्तिशाली होते की त्यांचा आवाज दूरवर ऐकू आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट निर्माण झाली आहे. तर सध्या पोलीस हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास करत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts