Divyanka Tripathi: टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आई झाली आहे. तिने जुळ्या मुलांना जन्म दिल्याने तिच्या आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण आहे. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी या जोडप्याच्या घरी पाळणा हल्ला असून त्यांनी सोशल मीडियावरून ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट
इंस्टाग्रामवर पोस्ट करत या दोघांनी सांगितले की, त्यांनी देवाकडे आनंदाची प्रार्थना केली होती आणि त्यांना “दुप्पट आनंद” मिळाला आहे. त्यांच्या घरात दोन गोंडस मुलांचे आगमन झाले आहे.
हेही वाचा: नाशिकमध्ये कांदा आंदोलन चिघळले; रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पोस्टमध्ये त्यांनी भावना व्यक्त करत म्हणाली
पोस्टमध्ये त्यांनी भावना व्यक्त करत लिहिले की, “आमची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमच्या आयुष्यात आता दोन लहान आनंदाचे स्रोत आले आहेत आणि आयुष्य अधिक सुंदर झाले आहे. आमचे ‘करण अर्जुन’ आले आहेत.” तसेच त्यांनी या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून प्रेम आणि आशीर्वाद मागितले आहेत.
सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव
ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून अनेक कलाकार आणि चाहते या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना, अंकिता लोखंडे, पूजा गौर, जेमी लीव्हर, आरती सिंग आणि अमित टंडन यांसारख्या कलाकारांनीही त्यांना पालकत्वासाठी अभिनंदन केले आहे.
दिव्यांका त्रिपाठीचे लग्न
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचे लग्न 8 जुलै 2016 रोजी भोपाळमध्ये पारंपरिक पद्धतीने झाले होते. लग्नाच्या 10 वर्षांनंतर आता त्यांच्या आयुष्यात ही सुंदर नवी सुरुवात झाली आहे.




