Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगी ज्योतिषी अशोक खरातच्या (Ashok Kharat) कारनाम्यांचा आता पर्दाफाश झाला आहे. अशोक खरातला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान त्यांना एक पेनड्राईव्ह सापडला होता ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तसेच अशोक खरातला अटक केल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आताही खरातचा नवा कारनामा समोर आला असून नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, 30 व्या वर्षी संपला जीवनप्रवास
करिअर घडवून देतो सांगत खरातने केली तरूणीची फसवणूक
नाशिकच्या सरकारवाडा पोलिसा स्थानकात अशोक खरातविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे. तर आताही एका तरूणीने खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. खरातने तरूणीला करिअर घडवून देतो असं सांगत तिची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ढोंगी खरातकडे एक तरूणी गेली होती. त्यावेळी त्याने तिला “मी महादेवाचा अवतार आहे आणि माझ्याकडे प्रचंड दैवी शक्ती आहे. त्यामुळे मी तुझं करिअर उज्ज्वल करून देतो”, असं सांगत तरूणीचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर खरात तरूणीला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला द्यायचा. त्या पाण्यात तो गुंगीचे औषध टाकायचा आणि तिला प्यायला द्यायचा. तसेच विशिष्ट प्रकारचे विधी करत तिच्यावर संमोहन करून तिच्यावर नियंत्रण मिळवायचा. अशाप्रकारे खरातने पीडित तरूणीवर अत्याचार केला होता.
धमकी देत खरातने तरूणीवर केला सहा महिने अत्याचार
खरातने 6 महिने पीडित तरूणीवर अत्याचार केला होता. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांमध्ये खरातने तरूणीवर अत्याचार केला. जेव्हा तरूणीने या प्रकाराला विरोध करण्यास सुरूवात केली तेव्हा “माझ्याकडे दैवी शक्ती असून जर तू मला विरोध केलास तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करेन”, अशी धमकी खरात देत होता. अशाप्रकारे खरातने तरूणीवर अत्याचार केला होता.
तरूणीने दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे. तर सध्या तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून (SIT) अशोक खरातची चौकशी केली जात आहे. तर 29 मार्चपर्यंत खरातच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.












