Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता समोर आला आहे. पोलिसांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्यानंतर त्याचे नवनवीन कारनामे समोर येताना दिसत आहेत. नराधम अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. तर आत्तापर्यंत खरातवर सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेत स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या खरातचा शालेय जीवनातील उजेड काय होता हे आता समोर आले आहे.
हेही वाचा – “उद्धव ठाकरे फक्त राजकारणीच नाहीत तर ते…”, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं ठाकरेंचं तोंडभरून कौतुक
ढोंगी अशोक खरातचा दहावीचा बोर्डाचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल
अशोक खरातचा दहावीचा बोर्डाचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दहावीच्या मार्कशीटने अशोक खरातचा भांडाफोड केला आहे. जो खरात स्वत:ला अंकशास्त्र तज्ञ म्हणवून घेत होता तो शालेय जीवनात गणितात नापास झाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
नाशिकच्या एसआयटी (SIT) तपासात अशोक खरातचा दहावीचा निकाल हाती लागला आहे. शालेय जीवनात अशोक खरात हा सामान्य विदार्थी होता आणि तो गणितात नापास झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या रेकॉर्डनुसार अशोक खरातचे नाव हे वेगळे होते. त्याचे नाव लक्ष्मण खरात असे होते. नंतर त्याने आपले नाव बदलत अशोक खरात असे नाव केले आहे.
अशोक खरातला गणितात किती मार्क्स मिळालेले?
अशोक खरातला दहावीच्या परीक्षेत 700 मार्क्स पैकी केवळ 251 मार्क्स मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी फक्त 35.88 % एवढी होती. त्याला गणितात 28 गुण (नापास), इंग्रजीत 37 गुण, मराठीत 39 गुण, विज्ञानमध्ये 62 गुण, हिंदीत 47 गुण आणि समाजशास्त्रामध्ये 38 गुण मिळाले होते.
अंकशास्त्रज्ञ म्हणून लोकांना गंडा घालणारा खरात हा गणितात नापास आहे. तसेच पोलिसांना खरातकडे अकंशास्त्रज्ञ असल्याचे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा पदवी सापडलेली नाहीये. त्यामुळे सगळ्यांना एकच धक्का बसला असून खरातचे दहावीचे मार्कशीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान त्यांना एक पेनड्राईव्ह सापडला होता ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तसेच अशोक खरातला अटक केल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसा स्थानकात अशोक खरातविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे.












