Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) नराधम ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातचे काळे कारनामे आता समोर येताना दिसत आहेत. त्याने अनेक महिलांच्या अंध विश्वासाचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे. तसेच त्याच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना तपासादरम्यान एक पेनड्राईव्ह सापडला आहे. ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांना सापडेल आहेत. तर आता आणखी एक खरातचा धक्कादायक कारनामा उघड पडला आहे.
हेही वाचा – “कोरोना काळासारखी तयारी आताही ठेवा…”, नरेंद्र मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन, नेमकं कारण काय?
निवडणूक जिंकून देण्यासाठी भोंदू खरातने नेमकं केलं काय?
नराधम अशोक खरातने थेट निवडणूक जिंकून देण्यासाठी तोटका वापरल्याचे आणि पूजा केली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला नेत्या निवडणूक जिंकण्यासाठी भामटा अशोक खरातकडे तोटका करण्यासाठी गेल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणत अशोक खरातने या महिला नेत्याला पूजा करण्यास सांगितले होते. तसेच याआधीही अशोक खरातने अनेक निवडणुकांपूर्वी असेच प्रकार केल्याचंही म्हटलं जात आहे. या धक्कादायक खुलाशानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित महिला नेत्याची SIT कडून होणार चौकशी
हा धक्कादायक प्रकार समोर येताच आता संबंधित महिला नेत्याच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच या महिला नेत्याची SIT कडून चौकशी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर या प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध ज्यातिषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातने अनेक महिलांच्या अंधश्रेद्धाचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलांचे शोषण केल्याचे एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.
कौटुंबिक वादाने त्रस्त असलेल्या एका विवाहित महिलेने अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत धक्कादायक खुलासा केला. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात होती. त्यामुळे ती हे वाद संपावे आणि सगळं चांगलं व्हावं म्हणून अशोक खरातकडे गेली. मग तिच्या मानसिकतेचा फायदा खरातने घेण्यास सुरूवात केली. “तू मागील जन्मी अप्सरा होतीस आणि तुझा घटस्फोट होणार आहे, हे आधीच निश्चित आहे”, असं सांगत खरातने पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने धार्मिक विधी, भविष्यातील संकाटाची भीती घालून त्या महिलेवर वारंवार अत्याचार केला असल्याचं उघड झाले आहे.












