Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना! अर्ज दाखल करताच बिचुकले म्हणाले, हातात सत्ता द्या, साताऱ्याचा ‘सितारा’ करून दाखवतो
Top News

कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना! अर्ज दाखल करताच बिचुकले म्हणाले, हातात सत्ता द्या, साताऱ्याचा ‘सितारा’ करून दाखवतो

राज्यात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. साताऱ्यातील कवी मनाचे नेते आणि बिग बाॅस फेम अभिजित बिचुकले यांनी सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मा‍झ्या हातात सातारा द्या, साताऱ्याचा सितारा करून दाखवतो असं यावेळी ते म्हणाले.

राज्यात 246 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा करताच नगरपरिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरताना दिसत आहेत. दरम्यान, कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. आता अभिजीत बिचुकले कुठून निवडणूक लढणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा – अभिनेत्री निवेदिता सराफ भाजपचं समर्थन करत बेधडक बोलल्या; विरोधकांनी त्यांची लाचारीच काढली..

अर्ज भरल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

साताऱ्यामध्ये मागील 25 वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची झालेली चाळण, बागांची दुरावस्था मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकलेल्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक बनवायचंय बरोबरच साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने सातारकरांनी मला नगराध्यक्ष बनवा, असं आवाहन बिचुकले यांनी यावेळी सातारकरांना केलं आहे.

सातारा नगरपालिकेतील सर्वांची अंडी-पिल्ली बाहेर काढणार

पुढे ते म्हणाले की, नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे. मी माझी सौभ्यावती अलंकृता बिचुकले यांचा प्रचार करत होतो. म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करुन मला नोकरीवरुन काढलं. एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला. सातारा नगरपालिकेतील सगळी अंडी-पिल्ली बाहेर काढायची आहेत. अभिजित बिचुकले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी साताऱ्याचे कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रथमच सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी चौफेर टीका करत, सातारकरांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार?

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts