Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आठवीच्या पुस्तकात ‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ प्रकरण, माजी सरन्यायधीश बी.आर. गवईंचा उल्लेख
Top News

आठवीच्या पुस्तकात ‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ प्रकरण, माजी सरन्यायधीश बी.आर. गवईंचा उल्लेख

Judicial corruption

Judicial corruption : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या (Social Science Book) पाठ्यपुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. आतापर्यंत केवळ न्यायालयांची रचना आणि कार्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या पुस्तकात आता पहिल्यांदाच ‘आपल्या समाजातील न्यायव्यवस्थेची भूमिका’ या धड्यात ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार’ (Judicial corruption) या संवेदनशील विषयाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील न्यायालयीन भ्रष्टाचार आणि भारताच्या न्यायव्यवस्थेला अडथळा (Obstruction of India’s judiciary) आणणाऱ्या संरचनात्मक मुद्द्यांचे तपशीलवार विश्लेषण (Detailed analysis of structural issues) दिले आहे.

हेही वाचा – जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर करत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे RSS वर डागली तोफ..

या प्रकरणात, सार्वजनिक न्यायावर परिणाम करणाऱ्या न्यायालयांमधील विविध स्तरांवरील तसेच प्रलंबित प्रकरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकातील प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुमारे ८१ हजार, उच्च न्यायालयांत ६२ लाख ४० हजार, तर जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल ४ कोटी ७० लाख प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद आहे. या प्रकरणात न्यायाधीशांची कमतरता हे खटल्यांच्या निकालात विलंब होण्याचे एक प्रमुख कारण सांगण्यात आले आहे. गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रिया आणि अपुरी न्यायालयीन पायाभूत सुविधा देखील न्यायालयीन कामकाजात अडथळा आणणारे प्रमुख घटक असल्याचे अभ्यासक्रमात नमूद आहे.

या प्रकरणात जुलै २०२५ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी केलेले विधान देखील समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यात म्हटले आहे की, “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाच्या घटनांचा जनतेच्या विश्वासावर नकारात्मक परिणाम होतो. हा विश्वास पुनर्संचयित करण्याचा मार्ग या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित, निर्णायक आणि पारदर्शक खटले मार्गी लावण्यात आहे. पारदर्शकता आणि जबाबदारी हे लोकशाहीतील महत्त्वाचे गुण आहेत.” या पुस्तकातून विद्यार्थ्यांना न्यायालयीन माहिती देणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले गेले आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts