CM Devendra Fadnavis | बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) विधानसभेची पोटनिवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत. एकिकडे काँग्रेसने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकासाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमदारकीसाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा – लग्नानंतर महिन्याभरातच ‘गुड न्यूज’? रश्मिका-विजयच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) भाष्य केलं. “मला असं वाटतंय की, सुनेत्रा ताईंना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहीजे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे. आर आर पाटील आबांच्या निधनानंतर भाजपने पोटनिवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. त्यावेळी भाजपने उमेदवार देखील दिला नव्हता. त्यामुळे आताही सर्व पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं.
बारामती पोटनिवडणूकीत शिवसेनेनं पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी, सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काँग्रेसला पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












