Breaking News :
Top News

मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळली, एकाचा दुर्दैवी मृत्यू

sunetra pawar devendra fadnavis 1

Madhya Pradesh Accident | मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) अनुपपूर (Anuppur) येथे एक भीषण अपघात घडला आहे. एक तीन मजली इमारत अचानक कोसळल्याची (Building Collapse) घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “भाजपने ठरवलं आहे…”

अग्रवाल लॉजची तीन मजली इमारत अचानक कोसळली

अनुपपूर जिल्ह्यातील कोटमा शहरात बसस्थानकाजवळ असलेल्या अग्रवाल लॉजच्या इमारतीत हा मोठा अपघात झाला. अग्रवाल लॉजची तीन मजली इमारत अचानक कोसळली.  इमारत कोसळल्यानंतर पोलीस आणि प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून, इमारत कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. अग्रवाल हॉटेलची इमारत अचानक कोसळल्याने संबंधित परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा इमारत कोसळली त्यानंतर 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघाताच्या वेळी इमारतीमध्ये अनेक लोक उपस्थित होते. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले.

शहर आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने कारवाई करत ढिगाऱ्याखालून दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात त्यांना मोठे यश आले आहे. तर त्या दोन्ही जखमी व्यक्तींना तात्काळ कोटमा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. मात्र, ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts