• Home
  • देश
  • तेल बाजारातून दिलासादायक बातमी; कच्च्या तेलाचे भाव घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
Top News

तेल बाजारातून दिलासादायक बातमी; कच्च्या तेलाचे भाव घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

crude oil

Crude Oil Prices | अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यात सामंजस्य करार होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक देशांना मोठा दिलास मिळाला आहे. अशातच आता तेल बाजारातूनही दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (25 मे) कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादिवशी बंगळुरूत खळबळ; जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने 6 पोलिसांना बसला दणका

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध लावण्यात आले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेल्या निर्बंधांमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात मोठी समस्या निर्माण झाली होती, ज्यामुळे इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता अमेरिका आणि इराण करार करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू असतानाच अचानक जागतिक तेलाचे भाव घसरले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज सकाळी 8:00 च्या सुमारास ब्रेंट क्रूड $4.51 ने म्हणजेच 4.36% ने घसरून प्रति बॅरल $99.03 वर आले आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमती $4.45 ने म्हणजेच 4.61% ने घसरून प्रति बॅरल $92.15 वर आल्या आहेत. क्रूड व्यतिरिक्त नैसर्गिक वायूचा व्यापार आज $2.891 प्रति एमएमबीटीयू दराने होत होता, जो $0.016 ने म्हणजेच 0.55% ने किंचित घसरला होता.

मागील आठवड्यातही अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती 8 टक्क्यांहून अधिक घसरल्या होत्या. तर ब्रेंट क्रूडच्या किमती 8 टक्क्यांहून अधिक घसरल्या होत्या. वाटाघाटींसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून इराणवरील आगामी हवाई हल्ले रद्द केल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर ही घसरण झाली.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांनी शांतता करारावरील सामंजस्य करारावर वाटाघाटी बहुतांशी पूर्ण केल्या आहेत. या करारामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts