Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘सत्याचा मोर्चा’त सत्य! एकट्या मुंबईत ११ लाख दुबार मतदार, आयोगाकडून शिक्कामोर्तब
Top News

‘सत्याचा मोर्चा’त सत्य! एकट्या मुंबईत ११ लाख दुबार मतदार, आयोगाकडून शिक्कामोर्तब

Apposition Leader

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोर्चा काढला होता. त्यामध्ये मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांचा एक महत्त्वाचा एक मुद्दा होता. आता विरोधकांच्या या आरोपात तथ्य असल्याचे समोर आलं आहे. आणि त्यावर खुद्द राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर एकट्या मुंबई शहरात तब्बल ११ लाख मतदार दुबार असल्याचा घोळ समोर आला आहे. विशेष म्हणजे एका व्यक्तीचे त्याचे नाव एक-दोन वेळा नाही तर तब्बल १०३ वेळा असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा एक विश्व विक्रमच आहे.

यामुळे खळबळ उडाली उडाली असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेने मतदार यादी शुद्धी मोहिम राबवण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. या नवीन अपडेटमुळे गेल्या महिन्यात ‘सत्याचा मोर्चा’ योग्य कारणासाठी काढण्यात आला होता, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर काही जण हा या मोर्चाचाच परिणाम असल्याचा दावा करत आहेत.

हेही वाचा – राज्याच्या तिजोरीवरून सत्ताधारी भिडले, तिजोरीची मा‍झ्या हातात, तिजोरीचा मालक आमच्याकडे..

मुंबई महापालिकेसाठी जी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे त्यात ११ लाख दुबार मतदार आढळले आहेत. आणि त्यातले असंख्य मतदार यांची तीन ते चार ठिकाणी नोंदणीकृत आहेत. आणि हे आता निवडणूक आयोगच मान्य करतंय. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो मुद्दा लावून धरत होती, ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘विराट असा ‘सत्याचा मोर्चा’ निघाला आणि त्यावर काहीही संबंध नसताना सत्ताधारी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाची बाजू घेत होते.. ते कुठे आहेत ? दुबार मतदार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत हे सत्ताधाऱ्यांना माहित नाही असं होऊच शकत नाही, मग त्यावर आवाज उठवायचा सोडून ते निवडणूक आयोगाच्या कारभारातील त्रुटींकडे दुर्लक्ष का करत होते ? असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व्यक्त करण्यात आले आहे.

केवळ एका व्यक्तीचे नाव 103 वेळा आलेले नाही तर अजून एक मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे अनेकदा मतदार यादीत घुसवण्यात आलेली आहे. हा आकडा धक्कादायक आहे. एकापेक्षा अधिक वेळा या व्यक्तींची नावे मतदार यादीत सापडली आहेत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने अगोदरच मतदार याद्यांच्या शुद्धीसाठी वेळ मागून घेण्यासाठी युक्तीवाद का केला नाही, असा सवालही विचारल्या जात आहे. आयोगाच्या या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुबार नावं कमी करण्यासाठी मोहिम राबवली जाणार

एखाद्या व्यक्तीची कितीवेळा मतदार यादीत नोंदणी झाली हे सविस्तर समोर आलेले नाही. वांगणीदाखल काही, नमुना म्हणून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे अनेकदा आल्याचे समोर आले. पण एकूण 11 लाख मतदारांचे दुबार नावं समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नावं शोधणं आणि ती मतदार यादी बाहेर काढणं हे मोठं आव्हान आहे. दुबार मतदारांची नावं कमी करण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मोहिम राबवली जाणार असल्याचे समोर येत आहे.

मत चोरीविरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा

मुंबईत उद्धव सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळाविरोधात आणि मत चोरीविरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा काढला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. या मोर्चानंतर शिंदेसेना, राष्ट्रवादीच नाही तर भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा मतदार यादीच्या शुद्धीची मागणी केली होती. दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी BMC ने डुप्लिकेट नावाविषयी सूचना दिल्याचे आणि त्याआधारे 5 डिसेंबरपर्यंत कालवधी वाढून देण्यावर विचार सुरु असल्याची माहिती दिली. आयोगाने हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीचा मुद्दा समोर आणला. धारावीतील मतदारांना मुद्दाम दुसऱ्या वार्डमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ते पोलिंग बुथपर्यंत, मतदान केंद्रापर्यंत पोहचू नयेत यासाठी असे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts