Breaking News :
  • Home
  • Top News
  • पेट्रोल- डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक कार खरंच फायदेशीर? विक्रीच्या आकडेवारीतून समोर आले वास्तव
Top News

पेट्रोल- डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक कार खरंच फायदेशीर? विक्रीच्या आकडेवारीतून समोर आले वास्तव

Electric Cars vs Petrol Diesel

Electric Cars vs Petrol Diesel: सध्या पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला पोहोचले असल्याने एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढताना दिसत असली तरी विक्रीच्या आकडेवारीत अजूनही पेट्रोल, डिझेल आणि CNG कारच आघाडीवर आहेत. सरकारकडून EV वापरला प्रोत्साहन दिले जात असले, तरी सर्वसामान्य ग्राहक अजूनही पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांनाच अधिक सुरक्षित आणि सोयीस्कार पर्याय मानत आहेत.

सध्या भारतीय कार बाजारात इलेकट्रीक वाहनांचा हिस्सा मर्यादित आहे. एकूण विक्रीपैकी केवळ ५ ते ६ टक्के वाहन इलेक्ट्रिक आहेत. म्हणजेच EV बद्दल उत्सुकता वाढत असली, तरी मोठ्या प्रमाणावर ग्राहक अजूनही पेट्रोल आणि CNG कारकडे वळताना दिसतात.

हेही वाचा: मोठी अपडेट! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ABHA कार्ड अनिवार्य; काय आहेत नवे नियम?

चार्जिंग सुविधांचा अभाव ठरतोय अडथळा

इलेक्ट्रिक कार खरेदी करताना अनेक ग्राहक सर्वप्रथम बॅटरी रेंज आणि चार्जिंग सुविधांचा विचार करतात. शहरांमध्ये काही प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध असले तरी ग्रामीण भाग आणि महामार्गांवर ही सुविधा अद्याप अपुरी आहे.

यामुळे लांब अंतराच्या प्रवासासाठी EV वापरण्याबाबत अनेकजण सांशक असतात. ” प्रवासादरम्यान बॅटरी संपली तर?” हा प्रश्न अनेक ग्राहकांना अजूनही सतावत असल्याने पेट्रोल किंवा डिझेल कार अधिक विश्वासार्ह वाटतात.

किंमतीमुळे सर्वसामान्य ग्राहक दूर

भारतातील अनेक इलेक्ट्रिक कार अजूनही महागड्या श्रेणीत मोडतात. चांगली रेंज आणि आधुनिक फीचर्स असलेली EV खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. त्याउलट पेट्रोल आणि CNG वाहनं तुलनेने स्वस्त असल्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक त्यांनाच पसंती देत आहेत.

विशेषतः पहिली कार खरेदी करणारे ग्राहक कमी बजेट आणि कमी देखभाल खर्च पाहून पारंपरिक वाहनांची निवड करतात.

याचा फायदा काय आहे?

इलेक्ट्रिक कारची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा कमी रनिंग कॉस्ट. घरच्या घरी चार्जिंग केल्यास EV चालवण्याचा खर्च पारंपरिक वाहनांच्या तुलनेत खूपच कमी येतो. त्यामुळे दररोज जास्त प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कार दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात.

तसेच EV मध्ये इंजिन ऑइल, क्लच किंवा गिअरबॉक्ससारख्या अनेक पार्ट्स नसल्यामुळे देखभाल खर्चही कमी असतो.

भविष्यात EV बाजार आणखी मजबूत होण्याची शक्यता

गेल्या काही वर्षांत भारतीय वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. Tata Motors, Mahindra, Hyundai आणि MG सारख्या कंपन्यांनी नव्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्यामुळे ग्राहकांमध्ये EV बद्दल आकर्षण वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात चार्जिंग नेटवर्क मजबूत झाले आणि बॅटरीची किंमत कमी झाली, तर भारतातही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि CNG वाहनांची पकड अजूनही मजबूत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts