Sukhoi-30 Aircraft – सध्या इस्त्रायल (Israel), अमेरिका (America) आणि इराण (Iran) या तीन देशांमध्ये मोठे युद्ध (War) सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच पेटताना दिसत आहे. यादरम्यान भारतानं (India) हे युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. कारण या युद्धाचा फटका इतर देशांसोबत भारतालाही बसला आहे. या युद्धामुळे भारतात तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोबत एलपीजी गॅसची समस्याही निर्माण झाली आहे. चिंता करणारी गोष्ट म्हणजे फक्त 25 दिवस पुरेल एवढाच एलपीजी गॅस भारताकडे शिल्लक राहिला आहे. तर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीली अमेरिकेने भारतावरील निर्बंध काढले आहेत. यादरम्यान आता भारतीय हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 (Sukhoi-30) फाइटर जेट रडारवरून गायब झाले आहे.
हेही वाचा – क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, ओपनर खेळाडू संघातून बाहेर?
भारताचे सुखोई-30 फाइटर जेट रडारवरून अचानक गायब झाले आहे. तर सध्या या लढाऊ विमानाचा शोध सुरू आहे. भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान हे सुखोई विमान आहे. आता हे महत्वाचे विमान अचानक गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुखोई-30 विमान कसे गायब झाले?
भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय विमान हे अचानक बेपत्ता झाले आहे. आसामच्या जोरहाट विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. तर संध्याकाळी 7.42 च्या सुमारास त्याचा रडारशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाच कोणताही संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली आहे.
अद्याप या विमानाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. या विमानात दोन वैमानिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर संध्याकाळी 7.42 च्या सुमारास या विमानाचा रडार आणि ग्राऊंड कंट्रोलसोबत संपर्क तुटला होता. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यास सुरूवात झाली असून बचावकार्य राबवण्यात आले आहे. तसेच सध्या सर्च ऑपरेशन सुरू असून या विमानाची माहिती मिळू शकलेली नाहीये.
घनदाट जंगलात विमान कोसळले
मिळालेल्या माहितीनुसार, सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. तर कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजान येथील रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे, सुखोई विमान जंगलात कोसळले आहे. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता विमानाचा शोध त्या दिशेने सुरू करण्यात आला आहे. तर अद्याप वैमानिकांबाबतही काहीही माहिती मिळालेली नाहीये. घनदाट जंगलात विमान कोसळल्यामुळे त्या भागात विमानाचा शोध घेतला जात आहे.










