Iran Attacks On French Naval Base | अमेरिका (America) आणि इस्त्रायलने (Israel) इराणवर (Iran) हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई (Ayatollah Ali Khameneni) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाचे वातावरण असून सध्या इराण खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेताना दिसत आहे. इराणने आधी दुबई, कुवेत अशा अनेक देशांसह इस्त्रायलवर हल्ला केला, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता इस्त्रायलला साथ देणाऱ्या फ्रान्सवरही इराणने जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळे फ्रान्सला इस्त्रायलला साथ देणं महागात पडलं आहे.
हेही वाचा – इस्त्रायलवर घातक हल्ला! इराणची मिसाईल थेट बेतशेमेशमध्ये, 12 जणांचा मृत्यू
इराणकडून फ्रान्सच्या नौदल तळावर हल्ला
इराणने आता अबू धाबी येथील फ्रान्सच्या नौदल तळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात नौदल तळावरील एका हँगरचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. तसेच इराणने डागलेल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ले हे बहरीन येथे तैनात 300 ब्रिटिश सैन्य कर्मचाऱ्यांच्या जवळ झाले आहेत, त्यामुळे ब्रिटिश सैन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दुसरीकडे, इराणकडून ब्रिटिश हवाई दलाच्या एअरबेसवरही ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याने मध्य पूर्व आणि युरोपच्या सुरेक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इस्त्रायलची साथ देणं ‘त्या’ तिन्ही देशांना पडलं महागात
दरम्यान, इराणकडून होत असलेल्या हल्ल्याची दखल घेत फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशांनी अमेरिका, इस्त्रायलला साथ दिली होती. इराणचे हल्ले रोखण्यासाठी हे तिन्ही देश इस्त्रायलसोबत सैन्य कारवाईत सहभागी होऊ शकतात, असा इशारा तिन्ही देशांकडून देण्यात आला होता. त्यामुळे इराणने या तिन्ही देशांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.












