• Home
  • ताज्या बातम्या
  • KVS Admission 2026-27: केंद्रीय विद्यालय प्रवेश 2026–27 लवकरच; वर्ग 1 मध्ये लॉटरीद्वारे निवड, पाहा अर्ज कसा करावा
Top News

KVS Admission 2026-27: केंद्रीय विद्यालय प्रवेश 2026–27 लवकरच; वर्ग 1 मध्ये लॉटरीद्वारे निवड, पाहा अर्ज कसा करावा

KVS Admission 2026-27

Eligibility Criteria for KVS Admission 2026-27: केंद्रीय विद्यालय (KVS) २०२६-२७ सत्र प्रवेश प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी पालकांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा चला तर जाणून घेऊयात.

केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) लवकरच २०२६-२७शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांचे केंद्रीय विद्यालयात प्रवेश घ्यायचा विचार करत असाल, तर ही महत्वाची माहिती आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश लॉटरीद्वारे होईल. ज्यामुळे निवड पूर्णपणे पारदर्शक राहील. पालकांनी अधिसूचना अधिकृत वेबसाईट kvsangathan.nic.in वर जाहीर केली जाईल. त्यानंतर पालक सहजपणे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने अर्ज येण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Railway Jobs: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११ हजारांहून अधिक लोको पायलट पदांसाठी लवकरच भरती होणार जाहीर

प्रवेशाची माहिती

इयत्ता पहिलीची प्रवेश निवड प्रक्रिया ही लॉटरी सिस्टमद्वारे होईल. म्हणजे निवड पूर्णपणे संगणकाद्वारे पारदर्शकपणे केली जाईल.
इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावी या वर्गांसाठी प्रवेशाच्या जागा उपलब्ध असतील. त्यामुळे, कोणत्याही प्रवर्गासाठी अर्ज करताना जागांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

पात्रता काय आहे?

इयत्ता पहिली- अर्जदार वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे. अर्जदाराची अचूक माहिती आणि प्रमाणपत्र अधिसूचनेत दिले जाईल. जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.

इतर श्रेणींसाठी वेगवेगळे पात्रता निकष लागू आहेत. अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.

आरक्षण

केंद्रीय शाळा सरकारच्या नियमांनुसार आरक्षण दिले जाते:

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

बदलीयोग्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य

आरक्षणामुळे अनेक कुटुंबांना प्रवेश घेणे सोपे झाले असते.

आवश्यक कागदपत्रे

जन्म प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

पासपोर्ट आकाराचा फोटो

पालकांनी kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राहील.

या अधिकृत वेबसाईट kvsangathan.nic.in वर भेटद्या

आवश्यक माहिती (नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी) अचूकपणे भरा

आवश्यक माहिती न भरल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

लॉटरी पद्धतीने इयत्ता पहिलीतील प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील.

प्रवेश यादी आणि पुढील प्रक्रियेसंबंधी माहिती वेबसाइटवर उपलब्ध असेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts