Andhra Pradesh Accident | आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) भीषण अपघात (Accident) घडला आहे. एका प्रवासी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाली, ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांना आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. तर या अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – “त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तो माणूस…”, मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले गंभीर आरोप
अपघात नेमका कसा घडला?
आंध्र प्रदेशमधील मार्कपूरम जिल्ह्यातील रायवरमजवळ एका प्रवाशी बसची खडीने भरलेल्या टिपर ट्रकशी जोरदार टक्कर झाली. यानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की बसमधील प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. आग इतक्या वेगाने पसरली की बसच्या मागील बाजूला असलेले प्रवासी आत अडकून पडले होते. तर या आगीत गुदरमून आणि होरपळून आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले असून सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
भीषण अपघातातबाबत मार्कपुरमच्या उपअधीक्षकांनी दिली मोठी माहिती
या घटनेची माहिती मार्कपुरमचे उपअधीक्षक (DSP) नागराजू यांनी दिली आहे. “या भीषण अपघातात 8 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 18 जखमी लोकांना वाचवून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बसमध्ये अजूनही काही मृतदेह अडकले असल्याची भीती असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपअधीक्षक (DSP) नागराजू यांनी दिली.
VIDEO | Andhra Pradesh: At least eight people were killed and about 18 injured in a bus fire accident in Markapuram district on Thursday. Rescue teams are working to identify the victims and gather details of their relatives.#AndhraPradeshNews #Fire
(Full video available on… pic.twitter.com/eDHHXcchAc
— Press Trust of India (@PTI_News) March 26, 2026
हा अपघात एवढा मोठा होती की संपूर्ण प्रवासी बस जळून राख झाली आहे. तर दुर्दैवानं या अपघातात आठ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या बचाव पथके मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
दरम्यान, या भीषण अपघातावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.












