Government Initiative to Bring PNG to Homes: देशातील काही भागात सध्या एलपीजी गॅस तुटवडा जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय युद्ध आणि जागतिक तणावामुळे गॅस पुरवठ्यावर दबाव वाढला असून, भारतातही याचा परिणाम दिसून येत आहे.
इराण-इस्त्रायल-अमेरिकेतील तणावामुळे जागतिक गॅस पुरवठ्यावर दबाव वाढला असून, भारतातही अनेक शहरात एलपीजी गॅस तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार घराघरांपर्यंत PNG (प्रकृतिक गॅस) पोहोचवण्याचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ही योजना पाणी आणि वीज कनेक्शन प्रमाणे सोपी आणि सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ बनविण्यावर लक्ष केंद्रित करेल.
हेही वाचा: एप्रिल 2026 मध्ये बुधादित्य राजयोगाचा जादू! मेष, मिथुन आणि सिंह राशींची चांदीच चांदी
पीएनजी क्षमता वाढविण्याचे पाऊल
आधी देशात दरवर्षी सुमारे ९ लाख मेट्रिक टन पीएनजी तयार होत असे, आता त्याची क्षमता ११ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना कनेक्शन देण्यासाठी नियम शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे पीएनजी उपलब्धता जलद आणि सुलभ होईल.
सण आणि धार्मिक विधींसाठी गॅसची व्यवस्था
जैन धर्मियांच्या ‘आंबील की ओली’ या सणासाठी गॅसची गरज भासल्यास, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यामुळे सणादरम्यान धार्मिक विधी व्यवस्थित पार पडतील आणि लोकांना गॅसची कमतरता भासणार नाही.
मात्र, मनसेने प्रतिक्रिया दिली, की विशिष्ट समाजाला गॅस देण्यासाठी दबाव टाकला गेला, तर ते गंभीरपणे पाहतील. तसेच काळाबाजार होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्याची तयारी आहे.
सरकारी पुढाकाराचे फायदे
घराघरांपर्यंत पीएनजी पाइपलाईन पोहोचवण्याची योजना
एलपीजीवर अवलंबित्व कमी करून गॅस तुटवडा टाळणे
सण आणि धार्मिक विधीसाठी गॅसची उपलब्धता सुनिश्चित करणे
नियम शिथिल करून कनेक्शन मिळवणे अधिक सोपे करणे
यामुळे नागरिकांना नियमित गॅस पुरवठा मिळेल आणि काळाबाजाराचा धोका कमी होईल.










