Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांवर दबावतंत्र? ऐन निडणुकीच्या तोंडावर निकटवर्तीयांवर गुन्हे शाखेची कारवाई
Top News

अजित पवारांवर दबावतंत्र? ऐन निडणुकीच्या तोंडावर निकटवर्तीयांवर गुन्हे शाखेची कारवाई

Pressure tactics against Ajit Pawar

Pressure tactics against Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाइन बॉक्स्ड’च्या कार्यालयावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई केलीय. अधिकाऱ्यांनी अरोरा यांच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाला आवश्यक असणारी माहिती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पुण्याच्या गुन्हे शाखेच्या या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे पुण्यात पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.

हेही वाचा – ‘प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं’; रिकाम्या खुर्च्यावरून ठाकरेंनी भाजपला डिवचलं

अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. त्यानंतर आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पण प्रचार थांबताच अजित पवारांचे राजकीय सल्लागार असणारे नरेश अरोरांच्या कंपनीच्या कार्यालयात गुन्हे शाखेचे अधिकारी तपासासाठी दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. अखेर अजित पवार यांनी स्वत: याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा आणि त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स्ड‘ यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकार्‍यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही“, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्थाडिझाइनबॉक्स्ड‘ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरवू नये

“या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे”, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts