Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या घरी जाऊन भेट
Top News

तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या घरी जाऊन भेट

Raj Thackeray Meet Sanjay Raut

Raj Thackeray-Sanjay Raut meet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचापूस केली आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची तब्येतीच्या कारणास्तव त्याची रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटी संदर्भात सुनील राऊत यांनी माहिती दिली.

हेही वाचा – मोठा निर्णय! प्रधानमंत्री कार्यालयाच्या नावात बदल, ‘सेवा तीर्थ’ देण्याचा ‘हा’ आहे महत्त्वाचा उद्देश

राऊत साहेब आजारी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, राज ठाकरे हे सतत फोनद्वारे माझ्या संपर्कात होते. ते सतत संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. त्यांच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, त्यांना युएसला नेलं पाहिजे का? अशी चैकशी ते संजय राऊत यांच्यासंदर्भात नेहमीच माझ्याकडे करत होते. दरम्यान त्यानंतर आता राज ठाकरे हे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते, त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

राज ठाकरे यांनी दिला संजय राऊत यांना सल्ला

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसचे त्यांनी संजय राऊत यांना सल्ला देखील दिला की, ज्या पद्धतीचा तुमचा आजार आहे, ते पहाता आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. लोकांमध्ये न मिसळता आणखी दीड महिने आराम करा आणि त्यानंतर मग तुम्ही जनतेमध्ये या, असा सल्ला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला आहे, अशी माहिती यावेळी सुनील राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे साधारणपणे वीस वर्षांनी संजय राऊत यांच्या घरी आले, मात्र आता बराच बदल झाल्यानं राज ठाकरे रस्त्यांच्या संदर्भात कन्फूज होते. आम्हालाही उत्सुकता होती, राज ठाकरे आमच्या घरी आले, त्यामुळे आम्हीही आनंदी आहोत, असं यावेळी सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts