Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर १० ते १५ जणांच्या टोळ्याने केला जीवघेणा हल्ला
Top News

शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर १० ते १५ जणांच्या टोळ्याने केला जीवघेणा हल्ला

Attack on Ram Khade

राज्याच्या राजकारण खळबळ उडवून देणारी बातमी बीड जिल्ह्यातून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री १० ते १५ जणांच्या टोळक्याने जिवघेणा हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एका ऐरणीवर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या श्रीदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर रात्री ९ ते ९:१५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. राम खाडे आणि त्यांचे सहकारी मांदळी येथील पाटील हॉटेल इथून रात्रीचे जेवण करून बाहेर पडत असताना, १० ते १२   हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. सर्वप्रथम किशोर मुळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना दूर पटांगणात नेऊन मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडल्या. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – भाजप-शिवसेना संघर्ष पेटला, निलेश राणेंचं भाजप कार्यकत्याच्या स्टिंग ऑपरेशन, थेट प्रदेशाध्यावर आरोप

तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला..

राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते नगर जिल्ह्यात असलेल्या मांदळी गावाच्या शिवारात असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे.

“…तर मग हा सरकार पुरस्कृत हल्ला आहे, असं म्हणावं लागेल,; – रोहित पवार

सातत्याने भ्रष्टाचारावर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी येथील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! न्यायालयाने त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश देऊनही सुरक्षा पुरवली नसेल तर मग हा सरकार पुरस्कृत हल्ला आहे, असं म्हणावं लागेल. या हल्ल्यातील आरोपी आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंड याचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा..

दरम्यान, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे. .

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts