• Home
  • राजकारण
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव; विजयच्या TVK चे व्ही. एस. बाबू ठरले ‘जायंट किलर’
Top News

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव; विजयच्या TVK चे व्ही. एस. बाबू ठरले ‘जायंट किलर’

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव; विजयच्या TVK चे व्ही. एस. बाबू ठरले 'जायंट किलर'

चेन्नई CM MK Stalin Lost : तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आणि सत्ताधारी द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना कोलाथूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे. कोलाथूर मतदारसंघ स्टॅलिन यांचा बालेकिल्ला मानला जात होता, इथं त्यांनी सलग तीन वेळा (2011, 2016 आणि 2021) विजय मिळवला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत विजय थलपथीच्या तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) चे उमेदवार आणि स्टॅलिन यांचे एकोकाळचे दीर्घकाळचे सहकारी व्ही. एस. बाबू यांनी त्यांना पराभूत केले. यापूर्वी, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांनी एआयएडीएमकेचे आदी राजाराम यांचा पराभव केला होता.

हेही वाचा : पुदुचेरीत मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांचा विजय; एनडीए आघाडीचा विजयही निश्चित

व्ही. एस. बाबू यावर्षीच गेले होते टीव्हीकेमध्ये :

मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पराभूत करणारे व्ही. एस. बाबू पूर्वी द्रमुकचे आमदार होते. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत कोलाथूर मतदारसंघासाठी एम. के. स्टॅलिन यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती, परंतु नंतर त्यांनी पक्ष सोडून एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, 7 फेब्रुवारी 2026 रोजी, ते विजय थलपथीच्या टीव्हीके (TVK) पक्षात सामील झाले.

कोलाथूरमधून सलग तीनवेळा स्टॅलिन यांचा विजय :

एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. ते तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत. 2018 मध्ये करुणानिधींच्या निधनानंतर, त्यांनी डीएमके (DMK) पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं. 2011 मध्ये, विल्लिवाक्कम आणि पुरासवाक्कम मतदारसंघांचे काही भाग एकत्र करुन कोलाथूर विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. या मतदारसंघाच्या निर्मितीपासून एम.के. स्टॅलिन हे आमदार आहेत. मात्र यंदा त्यांना पराभवाचा धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts