• Home
  • Top News
  • उबरच्या CEO ने स्वतःची कॅब सोडून केला मेट्रोने प्रवास! त्यानंतर केलेल्या वक्तव्याने दिल्लीकरांची मने जिंकली
Top News

उबरच्या CEO ने स्वतःची कॅब सोडून केला मेट्रोने प्रवास! त्यानंतर केलेल्या वक्तव्याने दिल्लीकरांची मने जिंकली

Uber CEO travel in delhi metro

Uber CEO Metro Ride: उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोशाही यांनी दिल्ली दोऱ्यात एक वेगळीच गोष्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वतःच्या कंपनीची कॅब वापरण्याऐवजी त्यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या या कृतीमुळे अनेक दिल्लीकर प्रभावित झाले.

आजच्या काळात उबर कॅब ही शहरांमधील दैनंदिन प्रवासाचा महत्वाचा भाग बनली आहे. कमी अंतर असो व लांबचा प्रवास, लोक सहजपणे उबरचा वापर करतात. मात्र, कंपनीचे सीईओच मेट्रोने प्रवास करताना दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

CEO म्हणाले की

भारत दौऱ्यादरम्यान दारा यांनी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ते दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनमध्ये प्रवास करताना दिसतात. त्यांनी सांगितले की मेट्रोचा अनुभव अतिशय सोयीस्कर आणि आरामदायक होता. दररोज लाखो प्रवासी वापरत असलेल्या या सेवेमुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होतो, असेही त्यांनी नमूद केला.

हेही वाचा: केरळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? अंतिम नावावर शिक्कामोर्तब, राजकीय हालचाली वाढल्या

पारंपरिक पोषाग परिधान

व्हिडिओमध्ये दारा यांनी पारंपरिक ‘मोदी जॅकेट’ परिधान केलेली दिसते. ते मेट्रोने प्रवास करून जोरबाग स्टेशनपर्यंत पोहोचतात आणि प्रवासाचा अनुभव आनंददायी असल्याचे सांगतात.

उबरच्या नव्या सुविधेबद्दल माहिती

याच वेळी त्यांनी उबरच्या नव्या सुविधेबद्दल माहिती दिली. आता उबर अॅपच्या माध्यमातून मेट्रो तिकिटेही बुक करता येणार आहेत. रोजच्या प्रवासाला अधिक सुलभ बनवण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत लाखो लोकांनी या सुविधेचा वापर केला आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

दरम्यान, सोशल मीडियावर काही युजर्सनी उबर सेवांबाबतच्या अडचणींचाही उल्लेख केला. एका व्यक्तीने टिप्पणी करत लिहिले की, सामान्य ग्राहकांना अनेकदा कॅब किंवा ऑटो सहज उपलब्ध होत नाहीत, विशेषतः बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये ही समस्या अधिक जाणवते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts