UPI Privacy Setting: आजकाल डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार करताना सुरक्षितता आणि प्रायव्हसीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी UPI पेमेंट करताना ही सेटिंग वापरा, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कोणालाही दिसणार नाही.
डिजिटल पेमेंटमुळे आपले व्यवहार अतिशय सोपे झाले आहेत. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉलपर्यंत आता UPI द्वारे काही सेकंदात पैसे पाठवता येतात. मात्र या सोयीसोबतच प्रायव्हसीबाबत काही धोकेही निर्माण होतात, कारण अनेक वेळा पेमेंट करताना तुमचा मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसू शकतो.
हेही वाचा: जेईई अॅडव्हान्स्ड रिस्पॉन्स शीट जाहीर, 25 मे रोजी येणार Answer Key; ‘या’ तारखेला लागणार निकाल
यामुळे स्पॅम कॉल्स, अनावश्यक मेसेजेस किंवा वैयक्तिक माहितीची गैरवापर होण्याची शक्यता वाढते. पण काही सोप्या सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता.
UPI प्रायव्हसी का महत्वाची आहे?
UPI व्यवहार करताना अनेकदा बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर दुसऱ्या व्यक्तीला दिसतो. हा नंबर पुढे गैरवापरासाठी वापरला जाऊ शकतो, त्यामुळे प्रायव्हसी जपणे महत्वाचे ठरते.
मोबाईल नंबर लपवण्याचे सोपे उपाय
1. कस्टम UPI ID वापरा
तुमचा खरा मोबाईल नंबर न दाखवता तुम्ही वैयक्तिक UPI ID तयार करू शकता.
Paytm: अॅपमध्ये प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन UPI ID बदलण्याचा पर्याय निवडा आणि नवीन नावाची ID तयार करा.
Google Pay: बँक अकाउंट सेटिंगमध्ये जाऊन UPI ID व्यवस्थापित करा आणि नवीन व्हर्च्युअल ID सेट करा.
BHIM App: अॅपमध्ये नवीन UPI नंबर किंवा अॅलियस तयार करण्याचा पर्याय वापरा.
2. व्हर्च्युअल UPI नंबर वापरा
NPCI आणि पेमेंट अॅप्सच्या मदतीने तुम्ही व्हर्च्युअल UPI नंबर तयार करू शकता, ज्यामुळे तुमचा खरा मोबाईल नंबर समोर येत नाही.
3. प्रायमरी UPI ID अपडेट करा
नवीन तयार केलेली कस्टम किंवा व्हर्च्युअल ID प्रायमरी म्हणून सेट करा. त्यामुळे भविष्यातील सर्व व्यवहार त्या ID द्वारे होतील आणि तुमची माहिती सुरक्षित राहील.






