Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • तामिळनाडूत ‘विजयरथ’ ची यात्रा सुरु… कुटुंबियांचा जल्लोष
Top News

तामिळनाडूत ‘विजयरथ’ ची यात्रा सुरु… कुटुंबियांचा जल्लोष

Tamilnadu Election

तामिळनाडू निवडणूक (Tamilnadu Election): संपूर्ण देशात निवडणूक ५ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचा धुमाकूळ चालू आहे. यात खास करून तामिळनाडू निवडणूक निकाल अत्यंत आकर्षक ठरलाय. तामिळनाडू चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थालापथी विजय ( Thalapathy Vijay) व त्याचा पक्ष (TVK) टीव्हीके अभूतपूर्व कामगिरी करत विजयाचा उंबरठ्यावर उभा आहे. या यशामुळे कार्यकर्ते व त्याच्या संपूर्ण चाहत्या वर्गात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात विजय थालापथी याच्या घरी त्याचा ह्या यशाचा आनंद साजरा करतानाचा विडिओ व्हायरल होताना दिसतोय.

कुटुंबियांना आनंदाश्रू (Tears of joy for the family)

या व्हिडिओमध्ये विजयचे संपूर्ण कुटुंब त्याचा निवडणुकीच्या यशावर आनंद व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते कि विजयाचा या अभूतपूर्व कामगिरीमुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. खासकरून जेव्हा विजयचे वडील जेव्हा लिफ्ट मधून वर येतात तेव्हा संपूर्ण कुटुंब हा आनंद व्यक्त करण्यासाठी विजयच्या वडिलांकडे धावून जाताना दिसते. तसेच विजयच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे देखील पाहायला मिळते.

एम. के. स्टॅलिन यांच्या पराभव (Defeat of M. K. Stalin)

या ऐतिहासिक मताधिक्यांमुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य आता तामिळनाडू निवडणुकांच्या निकालावर दिसते. एकीकडे इतर राज्यात निवडणुकात चुरशीची लढत सुरु असताना टीव्हीके मात्र एकहाती सरकार स्थापन करते कि काय असे चित्र दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या पराभव (Defeat of M. K. Stalin) थालापथी विजयच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी केला आहे. जी एक विस्मयकारक गोष्ट ठरते. ह्यामुळे विजय आता तामिळनाडूचा नवा मुख्यमंत्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टीव्हीके पक्षाची आश्वासने (TVK Party Promises)

या संपूर्ण निवडणुकीच्या निकालासाठी विजयच्या टीव्हीके पक्षाची आश्वासने हि अत्यंत महत्वाची ठरतात .
जसे कि –

1. 60 वर्षांपर्यंतच्या महिला कुटुंबप्रमुखांना दरमहा ₹2500 अनुदान दिले जाईल.
2. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 मोफत LPG सिलिंडर दिले जातील.
3. बहिणी आणि मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं तसेच रेशमी साडी देण्याची योजना राबवली जाईल.
4. इयत्ता 1 ते 12 मधील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000 चे शैक्षणिक अनुदान दिले जाईल.
5. पदवीधरांना दरमहा ₹4000 आणि डिप्लोमा धारकांना ₹2500 बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
6. 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल.
7. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 50% कर्जमाफी दिली जाईल.

आश्वासने पूर्ण होतील का?( Will the promises be fulfilled?)

तामिळनाडूच्या जनतेला दिलेली हि आश्वासने विजय पूर्ण करतो कि नाही हे आता खरोखर बघण्यासारखे आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts