Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मतदानाच्या दिवशी शिंदेच्या होमपिचवर भाजप-शिंदे गटात तुफान राडा
Top News

मतदानाच्या दिवशी शिंदेच्या होमपिचवर भाजप-शिंदे गटात तुफान राडा

Devendra Fadanvis-Eknath Shinde

bjp-shinde-clash : राज्यात आज 250 पेक्षा जास्त नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. काही ठिकाणी सुरळीत मतदान सुरु आहे, तर काही ठिकाणी समस्या आहेत. बदलापूरमध्ये मतदानाच्या दिवशी भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत. बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. बस स्टॅड परिसरात मतदारांना स्लिप वाटणे, त्याचबरोबर बुथ लावण्यावरून राडा झाला. राडा प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती.

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळीच सुरू झालीय. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी हे मतदान होतंय. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळतय. बदलापुरातल्या गांधी चौकातील मराठी शाळेत मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मतदान शांततेत पार पाडाव यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपाकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि कडून आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा – उद्याची मतमोजणी रद्द, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात. या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका पार पडतायत. पक्ष विस्तार आणि नवीन नेतृत्व घडवणं या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या असतात.

बोगस मतदान करणाऱ्या युवकाला बेदम चोप

बुलढाण्यात बोगस मतदान करताना एका युवकाला पकडलं. मतदान प्रतिनिधींनी या युवकाला चोप दिला. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. बोगस मतदान करणाऱ्या युवकाला इतरांनी पळवून लावलं. यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झालाय.

अक्कलकोट मध्ये EVM मशीन अर्ध्या तास बंद

अक्कलकोटमधील नगर परिषदेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरील EVM मशीन बंद पडली. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची उडाली तारांबळ. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts