Raj Thackeray bogus voters warning : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानावरून मोर्चासाठी रवाना झाले आहे. ते दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चर्चगेट स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. तर शरद पवार थोड्याच वेळात सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानावरून या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे देखील मातोश्री या निवासस्थानावरून मोर्चात सहभागी होण्यासाठी थोड्या वेळात रवाना होणार आहेत. त्यामुळे ठाकरी तोफा कोणावर डागल्या जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







