Mojtaba Khamenei | इराणचे (Iran) सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Supreme Leader Ayatollah Ali Khameneni) यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका (America) आणि इस्त्रायलने (Israel) केलेल्या हल्ल्यात खामेनेई यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमधील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात जोरदार युद्ध पेटले असून इराणकडून इस्त्रायलवरही मोठे हल्ले केले जात आहेत.
हेही वाचा – मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू, मीडियाने केली पुष्टी
खामेनेई यांच्या मृत्यूनतंर इराणचे संतप्त नागरिक प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर उतरले असून त्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात घोषणाबाजी केली आहे. तसेच खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामेनेई यांना ठार मारण्यात आल्यानंतर आता नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता इराणची सर्व जबाबदारी मोजतबा खामेनी यांच्याकडे असणार आहे.
दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोककळा पसरली असून इराण सरकारने संपूर्ण देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केला आहे. सोबतच 7 दिवसांसाठी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.












