• Home
  • राजकारण
  • संसदेचे विशेष कामकाज पुन्हा सुरू! ३० नोव्हेंबरला लोकसभा, २ डिसेंबरला राज्यसभा; अजेंड्यात काय?
देश

संसदेचे विशेष कामकाज पुन्हा सुरू! ३० नोव्हेंबरला लोकसभा, २ डिसेंबरला राज्यसभा; अजेंड्यात काय?

Parliament Special Session 2026
2
Parliament Special Session 2026 : ३० नोव्हेंबरला लोकसभा आणि २ डिसेंबरला राज्यसभेचे विशेष कामकाज होणार. ३ डिसेंबरला अधिवेशन संपण्याची शक्यता असून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर लक्ष.

संसदेच्या कामकाजाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे दोन्ही सभागृहांच्या बैठका पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. या बैठकींचा मुख्य उद्देश महत्त्वाची सरकारी कामे मार्गी लावणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठका कधी होणार?

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Special Session) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार आहे.

– लोकसभा : सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी बैठक होणार आहे.

– राज्यसभा : बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी कामकाज पुन्हा सुरू होईल.

– कामकाजाचा संभाव्य शेवट : ३ डिसेंबर २०२६ रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज संपण्याची शक्यता आहे.

मात्र, संसदेतील कामकाजाची गरज आणि सरकारी कामांच्या प्राधान्यक्रमानुसार अंतिम वेळापत्रकात बदल होऊ शकतो, (Lok and rajyasabha)असे रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Delimitation 2026 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून ७५ होणार? मतदारसंघ पुनर्रचनेचे गणित समजून घ्या

किरेन रिजिजू यांनी काय सांगितले?

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. संसदेतील आवश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी या बैठका आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कामकाजाच्या आवश्यकतेनुसार ३ डिसेंबरपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज संपवले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार? संसदेच्या या नियोजित बैठकांमुळे राजकीय आणि संसदीय वर्तुळात विविध विषयांबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात Delimitation शी संबंधित विधेयकांचा मुद्दा चर्चेत आहे. यापूर्वी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत आवश्यक बहुमत मिळाले नव्हते.

त्यामुळे या विषयावर सरकार पुन्हा काही पावले उचलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कामकाजात नेमकी कोणती विधेयके किंवा प्रस्ताव मांडले जाणार आहेत, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.

पावसाळी अधिवेशनानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू

२०२६ मधील पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, हे अधिवेशन औपचारिकरीत्या संस्थगित (Prorogue) करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याच अधिवेशनाचा पुढील भाग पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. आता नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या या बैठकांमध्ये केंद्र सरकार कोणते महत्त्वाचे विषय मार्गी लावते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

 

FAQs

 

Q1. संसदेचे विशेष कामकाज कधी सुरू होणार आहे?

लोकसभेचे विशेष कामकाज ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणार आहे.

Q2. राज्यसभेचे विशेष कामकाज कधी होणार आहे?

राज्यसभेची बैठक २ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Q3. संसदेचे विशेष कामकाज कधी संपण्याची शक्यता आहे?

दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर २०२६ रोजी संपण्याची शक्यता आहे. मात्र सरकारी कामकाजाच्या गरजेनुसार बदल होऊ शकतो.

Q4. संसदेच्या विशेष कामकाजाची घोषणा कोणी केली?

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेष बैठका पुन्हा बोलावण्याबाबत माहिती दिली.

Q5. विशेष कामकाजात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे?

महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघ पुनर्रचना यासंदर्भातील विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सरकारने अधिकृत कामकाजाचा संपूर्ण अजेंडा जाहीर केलेला नाही.

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts