Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ; ट्रम्प यांची घोषणा, काय म्हणाले?
ताज्या बातम्या

इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ; ट्रम्प यांची घोषणा, काय म्हणाले?

Donald Trump protest

Israel Hezbollah Ceasefire : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेनंतर, ट्रम्प यांनी इस्रायल आणि हिजबुल्ला या दहशतवादी गटातील शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यास सहमती दर्शवली. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतील इस्रायली आणि लेबनॉनच्या राजदूतांमधील बैठक खूप चांगली झाली. ओव्हल ऑफिसमध्ये त्यांनी हे देखील मान्य केलं की, त्यांना हिजबुल्लाचा विचार करावा लागेल.

हेही वाचा : मोजतबा खामेनेईंची शस्त्रक्रिया, चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी? नेमके कुठे आणि कसे

शस्त्रसंधी वाढली :

शस्त्रसंधी लागू झाल्यापासून अनेक वेळा उल्लंघन झालं आहे. सुरुवातीची शस्त्रसंधी गेल्या शुक्रवारी लागू झाली होती आणि तेव्हापासून दोन्ही बाजूंनी अनेक वेळा उल्लंघन झालं आहे. आता शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले की, अनेक दशकांनंतर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील हा पहिला थेट राजनैतिक संवाद आहे. 1948 मध्ये इस्रायलच्या स्थापनेपासून हे दोन शेजारी देश औपचारिकपणे युद्धात आहेत. सुरुवातीची 10 दिवसांची शस्त्रसंधी सोमवारी संपणार होती. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “लेबनॉनला हिजबुल्लापासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम करण्यासाठी अमेरिका त्याच्यासोबत काम करेल.”

काय म्हणाले ट्रम्प :

ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये सांगितलं की, ते येत्या दोन आठवड्यांत वॉशिंग्टनमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांना भेटण्यास उत्सुक आहेत. इस्रायलचे राजदूत येचिएल लाइटर म्हणाले, “आम्हाला आशा आहे की तुमच्या नेतृत्वाखाली, आम्ही इस्रायल आणि लेबनॉनमध्ये लवकरच औपचारिकपणे चिरस्थायी शांतता प्रस्थापित करू शकू.” लेबनॉनच्या राजदूत नादा हमादेह मोआवद यांनी ट्रम्प यांचे आभार मानत म्हटले, “लेबनॉनसाठी केलेल्या तुमच्या सर्व प्रयत्नांबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.” ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “मला विश्वास आहे की तुमच्या मदतीने आणि समर्थनाने, आम्ही लेबनॉनला पुन्हा महान बनवू शकतो.”

युद्धविरामासाठी लेबनॉनच्या अटी काय? :

एक दिवस आधी, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष औन यांनी म्हटलं होतं की, ताब्यात घेतलेल्या गावांमध्ये आणि शहरांमधील घरे पाडणे थांबवण्याची मागणी इस्रायल करेल. या आगामी चर्चेचे उद्दिष्ट इस्रायली हल्ले ‘पूर्णपणे’ थांबवणे, लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची माघार, इस्रायलमध्ये अटकेत असलेल्या लेबनीज कैद्यांची सुटका, सीमेवर लेबनीज सैन्याची तैनाती आणि पुनर्रचना प्रक्रिया सुरू करणे हे आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी लेबनॉनला हिजबुल्लाहला नि:शस्त्र करण्यासाठी इस्रायलसोबत काम करण्याचे आवाहन केले. “आमचे लेबनॉनसोबत कोणतेही गंभीर मतभेद नाहीत. काही किरकोळ सीमा विवाद आहेत जे सोडवले जाऊ शकतात,” असे सार म्हणाले. “दोन्ही देशांमधील शांतता आणि सामान्य संबंधांच्या मार्गात फक्त एकच अडथळा आहे: हिजबुल्लाह. लेबनॉन ‘सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि इराणी ताब्यापासून मुक्ती’ असलेलं भविष्य साध्य करु शकते.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts