Vastu Tips Daily Habits: वास्तूशास्त्रानुसार रोजच्या काही सवयी नकारात्मक परिणाम करू शकतात. या सवयी टाळल्यास जीवनात सकारात्मकता टिकवता येते, असे मानले जाते.
वास्तूशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही साध्या वाटणाऱ्या सवयी नकळत नकारात्मक परिणाम घडवू शकतात. या सवयी घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करून मानसिक, आर्थिक आणि कौटूंबिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, असे मानले जाते. त्यामुळे रोजच्या जीवनात कोणत्या सवयी टाळाव्यात आणि वास्तूनुसार कोणत्या गोष्टी महत्वाचा आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा: सोलापूर हादरलं! ३४ अल्पवयीन प्रसूती प्रकरण दडवल्याचा आरोप; अनेकांवर गुन्हे दाखल
वास्तूशास्त्रानुसार टाळाव्या अशा काही सवयी
सकाळी उशिरा उठणे
सूर्याला ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे शुभ मानले जाते. उशिरा उठल्याने ऊर्जेचा अभाव जाणवतो असे मानले जाते.
दुसऱ्यांचे कपडे वापरणे
वास्तूशास्त्रानुसार इतरांचे कपडे वापरल्याने त्यांची ऊर्जा आपल्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे मानसिक अस्थिरता किंवा तणाव वाढू शकतो असे म्हटले जाते.
नखं चावण्याची सवय
ही सवय एकाग्रता आणि निर्णयक्षमतेवर परिणाम करू शकते, असे मानले जाते.
अंथरुणावर बसून जेवणे
अंथरुणावर जेवणे राहू ग्रहाशी संबंधित नकारात्मक परिणाम घडवू शकते, असे वास्तूशास्त्रात नमूद आहे.
दक्षिण दिशेला बसून जेवणे
दक्षिण दिशा नकारात्मक ऊर्जा आणि यमाशी संबंधित मानली जाते, त्यामुळे त्या दिशेला बसून जेवणे टाळावे असे सांगितले जाते.
घरात पसारा ठेवणे
घर अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक तसेच मानसिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते.
झाडांची चुकीची मांडणी
तुळस आणि मनीप्लँट यांसारखी झाडे योग्य दिशेला (उत्तर-पूर्व) ठेवणे शुभ मानले जाते.
तुटलेल्या वस्तू ठेवणे
घरात तुटलेल्या वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तूशास्त्रात सांगितले आहे.












