Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • घरात या वस्तू कधीही ठेऊ नका रिकाम्या; अन्यथा नकारात्मकता निर्माण होण्यास लागणार नाही वेळ
लाईफस्टाईल

घरात या वस्तू कधीही ठेऊ नका रिकाम्या; अन्यथा नकारात्मकता निर्माण होण्यास लागणार नाही वेळ

Never Keep Household Items Empty

Never Keep Household Items Empty : आपण राहत असलेले घर हे फक् चार भिंती आणि छप्पर किंवा एखादी जागा नसून ते लक्ष्मीचे निवासस्थान आहे. आपण राहत असलेल्या घरात आपण योग्य स्वच्छता राखली, प्रत्येक वस्तूंची मांडणी नीटनेटक्या पद्धतीने केल्यास घरात सुख समृद्धी लाभते. याबाबत वास्तुशास्त्रात देखील नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घरात काही गोष्टी रिकाम्या ठेवल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. आणि या नाकारात्मकतेचा परिणाम आर्थिक स्थिती, मानसिक शांतता आणि घरातील वातावरण यावर दिसून येतो. म्हणूनच काही वस्तू कधीही रिकाम्या ठेऊ नका असं म्हंटल जातं.

धान्याची पेटी

स्वयंपाकघरात धान्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेट्या किंवा भांडी रिकामी ठेवणे नकारात्मकता निर्मण करते. स्वयंपाघरात धान्याचे डब्बे किंवा भांडे हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. धान्याचे भांडे जर रिकामे राहिले तर घरात पैशांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानुसार तांदूळ, गहू, डाळ यांची डब्बे सदैव भरून ठेवा. जर तुमच्या डब्यातील धान्य संपत आले असेल तर एक मूठभर तरी धान्य डब्यात असूद्या.

पाण्याचे भांडे

जीवनाचे प्रतीक म्हणजे पाणी. पाण्याचे भांडे किंवा पाण्याचा माठ कधीच रिकामा ठेऊ नका. रिकामे भांडे हे अभाव आणि अडचणींचे संकेत मानले जाते. खासकरून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचे भांडे भरून ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

तिजोरी

घरातील तिजोरी किंवा पॉकेट हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. जर तुम्ही तिजोरी रिकामी ठेवली तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कधीही पॉकेट मध्ये एखादी नोट किंवा नाणे ठेवा. आणि तिजोरीमध्ये देखील काही प्रमाणात रक्कम असणे गरजेचे आहे. जेणेकरून येणाऱ्या पैशांची आवक कायम टिकून राहते.

देवघर

आपल्या घरातील शुभ स्थान म्हणजे देवघर. या देवघरात कधीच विझलेला दिवा किंवा पूजेची जागा अस्ताव्यस्त राहू देऊ नका. कारण देवघरात तेल किंवा तूप संपलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे रोज देवपूजा करून दिवा लावणे, पूजेचे साहित्य योग्यरित्या मांडणे आवश्यक आहे. जर तुम्ही देवघर रुईकामे किंवा अस्ताव्यस्त ठेवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नाकारात्मकतेचा वास दरवळतो.

मीठ साखरेचा डब्बा

स्वयंपाक घरात अत्यावश्यक साहित्यांपैकी एक म्हणजे मीठ आणि साखर. या महत्वपूर्ण गोष्टी आहे. वास्तुशास्त्रानुसार मिठाचा डब्बा पूर्णपणे रिकामी होणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कधीही किराण्यातून एक्सट्रा मिठाचा पुडा आणून ठेवा. तसेच घरात साखरेचा डब्बा देखील कधीच रिकामा ठेऊ नका.

फुलदाणी

घर सजवण्यासाठी आपण अनेक वस्तू खरेदी करतो. त्यापैकी फुलदाणी आणि शोपीस या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या असतील तर चुकून सुद्धा रिकामे ठेऊ नका. यामुळे घरात कधीही रिकामेपणा आणि नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे फुलदाणीत निदान कृत्रिम फुले तरी ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना