Kolkata Test 651 Days Return : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होणार असल्याची चर्चा होती, टॉसमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतीय संघानं तीन अष्टपैलू खेळाडूंसह चार फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे ‘बापू’ म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षर पटेल दीर्घ अनुपस्थितीनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
हे ही वाचा – 2009 मधला ‘तो’ दिवस, जेव्हा क्रिकेट संघावर झाला होता हल्ला; आता पाकिस्तान-श्रीलंका मालिकेमुळं पुन्हा आठवणी ताज्या
अक्षर पटेल 651 दिवसांनंतर कसोटी सामना खेळणार :
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यासाठी टॉसनंतर भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलनं प्लेइंग इलेव्हन जाहीर केला तेव्हा संघात एकूण तीन फिरकी अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत अक्षर पटेलचाही संघात समावेश करण्यात आला. बराच काळ कसोटी संघात असलेल्या अक्षर पटेलला 651 दिवसांनंतर कसोटी सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानं मागील कसोटी सामना 2024 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध होता. अक्षर पटेलनं आतापर्यंत एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 19.35 च्या सरासरीनं 55 विकेट्स घेतल्या आहेत.
ऋषभ पंतचंही संघात पुनरागमन (Kolkata Test 651 Days Return)
इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळं बाहेर असलेला स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. पंतचं पुनरागमन झालं असलं तरी, ध्रुव जुरेलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेल्या साई सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे, याचं मुख्य कारण अपेक्षेनुसार कामगिरी न करणं आहे.
कोलकाता कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.












