Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • प्रेमाला वयाचे बंधन नसणारी विनोदी प्रेम कहाणी; दे दे प्यार दे 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई
मनोरंजन

प्रेमाला वयाचे बंधन नसणारी विनोदी प्रेम कहाणी; दे दे प्यार दे 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई

website 6 8

De De Pyaar De 2 First Day Collection : काल दे दे प्यार दे या चित्रपटाचा रिमेक प्रदर्शित करण्यात आला. सध्या गुजराती चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आता याच चित्रपटांना तोड देण्यासाठी अजय देवगण आणि आर माधवन यांची जोडी पुन्हा एकदा थिएटर गाजवायला तयार झाली आहे. या दोघांचा चित्रपट दे दे प्यार दे 2 काल सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचीथा, कॉमेडी, कमाई याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत.

किती आहे कमाई

दे दे प्यार दे या चित्रपटाने पाहिल्यादिवशी चांगली कामे केल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट 8 वर्षांपूर्वी 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या दे दे प्यार दे चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 8.50 कोटींची कमाई केली आहे. तर अद्याप परदेशातील चित्रपटांची आकडेवारी समोर आलेली नाही. या चित्रपटाबाबत चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दे दे प्यार दे 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो चांगलाच गाजला होता. शैतान नंतर पुन्हा एकदा अजय देवगण आणि आर माधवन यांची जोडी हिट होण्याचे चिन्हे आहे.

काय आहे कहाणी

दे दे प्यार दे 2 या चित्रपटात अजय देवगण आणि राकुल प्रीत सिंग यांच्या प्रेमकथेला पुढे नेण्यात आले आहे. या चित्रपटात आर. माधवन, जावेद जाफरी आणि मिजान जाफरी हे कलाकार प्रामुख्याने आहे. हा चित्रपट जोडप्यांमधील वयाचे अंतर दर्शवतो. हा मुद्दा दिग्दर्शकाने एका कॉमेडी पद्धतीने दर्शवला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला चांगले रिव्युज येत असल्याचे दिसत आहे. दे दे प्यार दे चा हा सिक्वेल प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत करतो. अजय देवगण आणि आर माधवन यांच्यातील विनोदी संवाद पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील नायिका रकुल प्रीत सिंग आणि मिजाज जाफरी यांनी देखील चांगले काम केले आहे.

अजय आणि राकुलची केमिस्ट्री भावली

या चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात आर. माधवन यांनी वडिलांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. चित्रपटातील मिजान जाफरी आणि रकुल प्रीत सिंग यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुमन शर्मा यांनी केले आहे.

G5yiifCbYAAl6Gh
De De Pyaar De 2 First Day Collection

पहिल्या भागात झाली होती एवढी कमाई (De De Pyaar De 2 First Day Collection)

2019 साली आलेल्या दे दे प्यार दे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.11 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमधून देखील ₹१.३० कोटी कमावले होते. म्हणूनच पहिल्या दिवशी एकूण कलेक्शन ₹१०.४१ कोटी झाले होते. म्हणजेच आता रिलीज झालेल्या दे दे प्यार दे 2 चित्रपटाने पहिल्या चित्रपटापेक्षा कमी नफा मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts