उत्तर अमेरिकेतील युनायटेड मेक्सिकन स्टेट्स देशातील मेक्सिको शहरात Gen-Z चे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. मेक्सिकोमधी वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी हजारो तरुणांनी आंदोलन केलं. Gen-Z च्या तरुणांनी केलेल्या निदर्शनांना विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, निदर्शनाचं हिंसाचारात रुपांतर झालं. हिंसाचारात असंख्य जखमी झाले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. मेक्सिकोचे नागरी सुरक्षा सचिव (एसएससी) पाब्लो वाझक्वेझ कामाचो यांच्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या मोर्चात एकूण 100 पोलीस जखमी झाले आहेत. त्यापैकी 40 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तर चार जणांना मानसिक धक्का बसला आहे. जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. तर या संघर्षात 20 नागरिक जखमी झाले आहेत.
20 जणांना अटक
20 जणांना अटक करुन दिवाणी न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आलं. Gen-Z मार्चनंतर माध्यमांना संबोधित करताना वाझक्वेझ कामाचो यांनी उसळलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. ते म्हणाले, “आम्ही मोर्चादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांचा निषेध करतो. या संघटित गटांच्या अस्तित्वाचाही निषेध करतो. ते अनेकदा या कृत्यांना समर्थन देतात.”
हेही वाचा – “आपल्या जिभेवर आणि विधानांवर ताबा ठेवा..” भाजप खासदाराला थेट धमकी..
17 वर्षीय तरुणाला अटक करुन ठार करण्यात आलं
महापौरांची झाली होती हत्या : निदर्शनात विविध वयोगटातील लोक सहभागी झाले होते. नुकत्याच मारल्या गेलेल्या मिचोआकानचे महापौर कार्लोस मांझो यांचे समर्थक त्यांच्या राजकीय आंदोलनाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉ टोप्या घालून उपस्थित राहीले. 1 नोव्हेंबर रोजी उरुआपनमध्ये कार्लोस यांना गोळीबार करुन ठार करण्यात आलं. ड्रग्जचे व्यसन असलेल्या 17 वर्षीय तरुणाला अटक करुन ठार करण्यात आलं आहे.
कशामुळं तरुणाई निराश?
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2010 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जन्मलेल्या तरुणांनी असमानता, भ्रष्टाचार आणि लोकशाही अधोगतीविरुद्ध नेपाळसह अनेक देशांमध्ये आंदोलन केले आहेत. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनामुळं ज्यामुळं पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या वर्षी बांगलादेशातही अशीच निदर्शनं झाली होती. मेक्सिकोमधील अनेक तरुणांचं म्हणणं आहे, भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी कठोर नाही. त्यामुळं निराशाजनक स्थिती आहे.












