Neville Tata successor – रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर टाटा समूहात बरेच वादविवाद, फेरबदल होताना दिसले. टाटा समूहात त्यांच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला. आता रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहे. यामुळे आता टाटा घराण्यात मोठा फेरबदल होताना दिसत आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटाची जबाबदारी देण्यात आली असल्याने टाटा समूहामध्ये गटबाजीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नोएल टाटा हे इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांनी ट्रस्ट आणि टाटाच्या कुटुंबाची भागीदारी वाढावी यासाठी अथांग प्रयत्न केले. आता कोण आहेत टाटा समूहाचे उत्तराधिकारी याकडे लक्ष लागून होते.
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून ओळखल्या गेलेले नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल यांना मंगळवारी टाटा ग्रुपच्या सर्वात प्रभावी ट्रस्टपैकी एक असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्थ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार नोएल टाटा यांनी आता त्यांच्या मुलाला सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये महत्वाचा भाग म्हणून घोषित केले आहे. त्यानुषंगाने आता नोएल टाटा हे पुढची पिढी तयार करत असल्याचे म्हंटले जात आहे. एवढेच नाही तर त्यांच्या मुलाला जबाबदार बनविण्याबरोबरच टाटा समूह बळकट करण्याचा नोएल यांचा प्रयत्न असू शकतो.
हे ही वाचा – FD पेक्षा जास्त रिटर्न हवे असेल तर या सरकारी योजनेमध्ये गुंतवा पैसे, मिळेल जास्त रिटर्न
टाटा ट्रस्ट मध्ये किती आहे सर दोराबजीचा हिस्सा
सर दोराबजी टाटा ट्रस्ट हे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. हि सॉल्ट टू सॉफ्टवेअर सुमूहाची होल्डिंग कंपनी असून त्यांच्याकडे 27.98 टक्के टाटा सन्स मध्ये मालकी आहे. जेव्हा रतन टाटा यांचे निकटवर्तीय मेहल मिस्त्रीला ट्रस्टच्या बाहेर काढण्यात आले तेव्हाच नेमकं नेव्हिलची एन्ट्री झाली.
नोएल टाटाच्या तिन्ही मुलांना टाटा समूहात वेगवेगळी जबाबदारी
रतन टाटा यांनी कधीच कुटुंबातील सदस्यांना व्यवसायात आणले नाही. ते स्वतः कधीही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कंपीनीची सत्ता देण्यास तयार नव्हते. त्यांनी टाटा ट्रस्ट मजबूत करण्यासाठी कुटुंबाला कधीच मध्ये न आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनले. आणि त्यानंतर नोएल टाटा यांनी तिन्ही मुलांना कंपनीत वेगवेगळी जबाबदारी दिली. तर आता त्यांचा अजून एक मुलगा टाटा समूहात मोठी जबाबदारी पार पडणार आहे.
कोण आहे नेव्हिल टाटा
32 वर्षीय नेव्हिल टाटा हे नोएल टाटा यांचे सुपुत्र असून ते सध्या टाटा समूहाच्या रिटेल सुपर मार्केट चैम स्टार बाजारची जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय नेव्हिल टाटा यांच्याकडे फास्ट फॅशन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुडीओची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. नेव्हिल यांच्या शैक्षणिक आयुष्याबद्द्ल बोलायचं झालं तर त्यांनी बेयर बिझनेस स्कुलमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी टाटाच्या ट्रेंड लिमिटेडपासून करिअरची सुरुवात केली. आणि मग त्यांनी झुडीओ, स्टार बाजार या व्यवसायाची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली.
वैवाहिक जीवन (Neville Tata successor)
टाटा समूहाचे उत्तराधिकारी असलेले नेव्हिल यांच्या वैवाहिक जीवनाबददल बोलायचे झाले तर त्यांचे लग्न 2019 मध्ये मानसी किर्लोस्करसोबत झाले होते. मानसी ही 13488 कोटींच्या किर्लोस्कर मोटर्सची उत्तराधिकारी आहे. मानसी ही विक्रम किर्लोस्कर आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. किर्लोस्कर कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे.












