Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • नोव्हेंबरचा शेवटचा तिसरा आठवडा असणार खास; कारण या OTT प्लॅटफॉर्म वर रंगणार भन्नाट वेब सिरीजचा खेळ
मनोरंजन

नोव्हेंबरचा शेवटचा तिसरा आठवडा असणार खास; कारण या OTT प्लॅटफॉर्म वर रंगणार भन्नाट वेब सिरीजचा खेळ

OTT platforms collage showing upcoming web series thumbnails releasing in the third week of November

November OTT week 3 web series : नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर भन्नाट धमाका होणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर बऱ्याच बहुचर्चित वेब सिरीज आणि चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. अप्रतिम ड्रामा, ऍक्शन सीन्स, थ्रिलर, रोमान्स, कॉमेडी, स्पोर्ट, आणि फॅमिली ड्रामा, धमाकेदार कंटेन्टचा भरमसाठ मनोरंजनाचा डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी हा आठवडा मनोरंजनाचा सोहळाच ठरेल. जाणून घ्या या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणाऱ्या वेब सिरीज आणि चित्रपट.

1 नाडू सेंटर (Nadu center)

 

नाडू सेंटर ही वेब सिरीज jio Hotstar या OTT प्लॅटफ़ॉर्मवर 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हि वेब सिरीज तामिळ भाषेत असून हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. जो की कॉलेजच्या जीवनावर आधारित आहे. ही सिरीज बास्केट बॉल खेळणाऱ्या खेळाडूंभोवती फिरते. या वेब सिरीज मध्ये शशी कुमार, कलैयारसन, आशा शरथ आणि दिल्ली गणेश यांची भूमिका आहे.

हि वेब सिरीज एकूण 17 भागांची असून साप्ताहानुसार हे भाग रिलीज होतील. हि कहाणी पिके नावाच्या एका 17 वर्षीय मुळाभोवती फिरते. ज्याला प्रतिष्टित शाळेतून शिस्त नसलेल्या संस्थेत पाठवले जाते. तिथे तो खेळ आणि मैत्रीच्या माध्यमातून स्वतःमध्ये अनेक बदल घडवतो.

2 फॅमिली मॅन सिझन 3 (The Family Man – Season 3)

फॅमिली मॅन सिझन 3 ही वे सिरीज Amazon prime video या प्लॅटफॉर्म वर 21 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये नोज बाजपेयी, प्रियामणि, शारीब हाश्मी, श्रेया धन्वंतरी असणार आहे. हि भारतातील लोकप्रिय सर्वात मोठी स्पाय थ्रिलर सिरीज आहे. या वेब सीरिजचे 2 भाग लोकप्रिय झाले असून चाहत्यांना या तिसऱ्या सिरींजची प्रतीक्षा होती.

3 बायसन (Bison)

बायसन हा चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला होता. आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. हा एक रूरल स्पोर्ट ड्रामा असून तामिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आल्या आहे.

4 बंगाल फाईल्स (the bangal files)

बंगाल फाईल्स ने चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE 5 वर 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, पाळावी जोशी आणि दर्शन कुमार यांची भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. हा एक राजकीय नाट्यमय चित्रपट आहे.

5 होमबाऊंड (Homebound)

हा चित्रपट 21 नोव्हेंबरला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान आहे. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts