• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं कोलकाता; लोक घरे सोडून पळाले, कुठं होता भूकंपाचा केंद्रबिंदू?
Top News

भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं कोलकाता; लोक घरे सोडून पळाले, कुठं होता भूकंपाचा केंद्रबिंदू?

People evacuating homes in Kolkata after earthquake tremors

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजधानीतून या क्षणाची मोठी बातमी येत आहे. शुक्रवारी सकाळी कोलकाता इथं भूकंप झाला. सकाळी 10:08 ते 10:10 दरम्यान काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचं केंद्र शेजारच्या बांगलादेशातील घोराशालपासून 7 किलोमीटर अंतरावर होतं. कोलकाता व्यतिरिक्त, मालदा, नादिया, कूचबिहार आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

का होतात भूकंप? :

अलीकडेच, देश आणि जगाच्या अनेक भागात भूकंपांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या पृथ्वीवर सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत त्यांच्या जागी हलतात. मात्र, कधीकधी त्या एकमेकांशी टक्कर घेतात किंवा घर्षण अनुभवतात. यामुळेच पृथ्वीवर भूकंप होतात. याचा सर्वाधिक त्रास सामान्य लोकांना होतो. भूकंपांमुळं घरं कोसळतात आणि हजारो लोकांचा मृत्यू होतो.

हे ही वाचा : जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 4.4 किमी वर उडाली राख; अनेक उड्डाणं रद्द

भारतात भूकंप क्षेत्र कोणते आहेत? :

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भारताच्या एकूण भूभागापैकी सुमारे 59% भूभाग भूकंपप्रवण मानला जातो. शास्त्रज्ञांनी भारताच्या भूकंप क्षेत्राचे चार भाग केले आहेत: झोन 2, झोन 3, झोन 4 आणि झोन 5. झोन 5 मधील क्षेत्रे सर्वात असुरक्षित मानली जातात, तर झोन 2 सर्वात कमी असुरक्षित मानली जातात. आपल्या देशाची राजधानी दिल्ली झोन 4 मध्ये येते. इथं 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप येऊ शकतात, ज्यामुळं मोठा विनाश होऊ शकतो. भारतातील हिमालयीन प्रदेश आणि इतर अनेक फॉल्ट लाइन (जसं की कच्छ, ईशान्य भारत) भूकंपाचा धोका जास्त असतो, कारण भारतीय प्लेट युरेशियन प्लेटशी टक्कर घेते.

 

रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता :

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वापरुन मोजली जाते. रिश्टर स्केलवर 4 ते 4.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं घरातील वस्तू त्यांच्या स्थानावरुन खाली पडू शकतात. 5 ते 5.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं जड वस्तू आणि फर्निचर हलू शकतात. 6 ते 6.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारतीच्या पायाला भेगा पडू शकतात. 7 ते 7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळं इमारती कोसळू शकतात. 8 ते 8.9 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळं त्सुनामी येऊ शकते आणि मोठा विध्वंस होऊ शकतो. 9 किंवा त्याहून अधिक रिश्टर स्केलच्या भूकंपामुळं सर्वात जास्त विनाश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts