• Home
  • देश
  • राखेचा ढग दिल्लीच्या दिशेने; इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात बदल
Top News

राखेचा ढग दिल्लीच्या दिशेने; इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात बदल

Hele Gubbi volcano in Ethiopia erupting with a massive ash cloud rising on one side, showing dark smoke spreading into the sky

Hele Gubbi volcano ash cloud : काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेक झाल्यामुळे आता देशावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक प्रशासनाने
अनेक विमाने रद्द केले आहे. कारण या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा मोठा ढग दिल्ली आणि देशात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वातावरणात प्रचंड परिणाम दिसून येत असून
आता हा रखेच ढग राजस्थान येथून दिल्ली आणि आता देशात पुढे सरकताना दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज वातावरण ढगाळ असणार आहे. तसेच आज अंधुक ढग दिसण्याची शक्यता आहे. हे राखेचे ढग लाल समुद्र ओलांडून 130 किलोमीटर वेगाने भारताकडे सरकत असल्याचे दिसत आहे.
सध्या हे ढग जोधपुर आणि जैसलमेरमध्ये हे ढग पोहोचले असून दिल्लीच्या दिशेने जात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तात्काळ भारतातील विमानसेवा रद्द करण्याकहा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हे ही वाचा : या देशात उगवत नाही सहा महिने सूर्य, याच ठिकाणी संपते जग

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास राखेच्या ढगामुळे सूर्य प्रकाशावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आज काही वेळ अंधार होण्याची शक्यता आहे. याशिवाय या राखेच्या ढगामुळे देशात वायूप्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली राजस्थान आणि हरियाणातील बऱ्याच भागांमध्ये वातावरणात बदल होऊन अधिक प्रमाणात धूळ दिसत आहे. अमेरिकेतील हवामान अंदाज वेबसाइट AccuWeather नुसार दिल्लीतील हवा सध्या अत्यंत अशुद्ध असल्याचे सांगण्यात येत असून तेथील सकाळी 6 वाजता AQI 300 पर्यंत होता.

 

देशातील अनेक विमानसेवा रद्द

हे इथिओपियन हेले गुबिन ज्वालामुखीतील राखेचे ढग सल्फर डायऑक्साइडचे बनलेले असण्याची शक्यता आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारताच्या डीजीसीएने विमान कंपन्यांना एक सूचना जारी केली होती. त्यानुसार ज्वालामुखीच्या राखेमुळे विमानाच्या इंजनवर गंभीर परिणाम निर्माण होऊ शकतो. या वातावरणातविमान उड्डाण अत्यंत धोकादायक होऊ शकते. यामुळे दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणारे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.

इथिओपियामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे रविवारी सकाळी राखेचा मोठा लोट 10 ते 15 किलोमीटर उंचीवर गेला होता. यामुळे निर्माण झालेला राखेकहा कण विमानाच्या इंजिनवर गंभीर परिणाम करू शकतात.
या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगामुळे देशात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

डीजीसीएने दिल्या विशेष सूचना

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांसाठी तातडीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विमान कंपन्यांनी राखेचा ढग असलेल्या प्रभावित क्षेत्रातून प्रवास करणे टाळावे,
नवीनतम सूचनांनुसार प्रवासाचे नियोजन, आणि मार्ग निश्चिती करून इंधनाचा विचार करावा, कोणत्याही राखेचा सामना, इंजिनच्या कार्यक्षमतेतील त्रुटी किंवा केबिनमधील धूर/वास आढळल्यास तातडीने त्याची माहिती द्यावी.
जर राखेमुळे विमानतळ कामकाजावर परिणाम हॉट असल्यास संबंधित ऑपरेटरने धावपट्ट्या, टॅक्सीवे आणि ॲप्रन्सची तातडीने तपासणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts