Air India IndiGo A320 advisory : भारतातील एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या एअरबस A320 मालिकेतील विमानांमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्या असून, त्या सोडवल्या जात आहेत. एअरबस A320 प्रकारातील विमानांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर बदल आवश्यक असल्याचे वृत्त आहे. या अपडेटला वेळ लागू शकतो, ज्यामुळे उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अनेक मार्गांवरील हवाई प्रवासात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. एअरबसने त्यांच्या जागतिक A320 मालिकेतील विमानांच्या ताफ्यासाठी जारी केलेल्या तांत्रिक निर्देशानंतर देशांतर्गत विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगोने शनिवारी संभाव्य विलंब आणि वेळापत्रकात बदलांची घोषणा केली.
गैरसोयीबद्दल एअर इंडिया दिलगीर :
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, एअर इंडियानं म्हटलं की, A320 मालिकेतील विमाने सध्या सर्व एअरलाइन्स ऑपरेटर्सच्या सेवेत आहेत. यासाठी त्यांच्या ताफ्याच्या काही भागासाठी सॉफ्टवेअर/हार्डवेअर बदल आवश्यक असतील. “संपूर्ण विमानं पूर्णतः अपडेट होईपर्यंत प्रवाशांना होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल एअर इंडिया दिलगीर आहे.” आम्ही ग्राहकांना त्यांची उड्डाण स्थिती तपासण्याची विनंती करतो, असंही एअर इंडियानं म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: Several airlines, including IndiGo and Air India, will face disrupted operations as Airbus’ analysis of a recent event involving an A320 Family aircraft has revealed that intense solar radiation may corrupt data critical to the functioning of flight controls.… pic.twitter.com/UFOLklFGyJ
— ANI (@ANI) November 29, 2025
अनेक विमानांवर याचा परिणाम :
दरम्यान, 11 नोव्हेंबरला एअर इंडियाने त्यांच्या जुन्या A320neo ताफ्यासाठी रेट्रोफिट कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा केली. 27 विमानांपैकी शेवटचं विमान अगदी नवीन केबिन इंटिरियर आणि एअरलाइनच्या नवीन आकर्षक शैलीसह सेवेत परतलं. एअर इंडियानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं की, विस्ताराच्या विलीनीकरणानंतर एअर इंडियामध्ये समाकलित झालेल्या 14 नवीन A320neo विमानांसह एअरलाइन्स आता नवीन किंवा अपग्रेड केलेल्या केबिन इंटिरियरसह 104 A320 कुटुंबातील विमाने चालवतं. भारतीय विमान कंपन्यांकडे सुमारे 560 A320 प्रकारातील विमाने आहेत आणि त्यापैकी 200-250 विमानांना सॉफ्टवेअर बदल किंवा हार्डवेअर रीअलाइनमेंटची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील 200-250 विमानांवर याचा परिणाम होणार आहे.
हे ही वाचा : 1 डिसेंबर पूर्वी करा हे काम; 1 डिसेंबर पासून नियमात होणार हे महत्वाचे 5 बदल
उड्डाण वेळापत्रकांमध्ये थोडे बदल :
X वरील एका पोस्टमध्ये, इंडिगोनं सुरक्षितता महत्त्वाची आहे यावर भर दिला आणि खातरजमा केली की, ते सर्व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार त्यांच्या A320 विमानांमध्ये आवश्यक बदल अद्ययावत पद्धतीनं परिश्रमपूर्वक आणि काळजीपूर्वक अंमलात आणत आहे. हे सावधगिरीचं अपडेट लागू केले जात असताना काही उड्डाणं वेळापत्रकांमध्ये थोडे बदल केले जाऊ शकतात. एअरबसने जागतिक A320 ताफ्यासाठी तांत्रिक मार्गदर्शत तत्त्वं जारी केलीय. “आम्ही सर्व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आमच्या विमानातील आवश्यक अपडेट परिश्रमपूर्वक आणि काळजीपूर्वक पूर्ण करीत आहोत.” इंडिगोनं लिहिलं, “आमच्या टीम प्रवाशांना रीबुकिंग, अपडेट्स आणि माहितीसह मदत करण्यासाठी 24/7 उपलब्ध आहेत. विमानतळावर जाण्यापूर्वी प्रवाशांनी अॅप/वेबसाइटवर त्यांची नव्या फ्लाइट स्थिती तपासावी,” अशा सूचनाही एअर इंडियानं केल्या आहेत.












