• Home
  • देश
  • धक्कादायक..! विमानाने प्रवास करताय तर पुढचा धोका ओळखा..! ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी
Top News

धक्कादायक..! विमानाने प्रवास करताय तर पुढचा धोका ओळखा..! ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी

airplane

Technical Glitches of Commercial Aircraft : विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तब्बल ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी (Technical Glitches) असल्याचा धक्कादायक अहवाल संसदीय समितीने (Parliamentary Committee) सादर केला आहे. गतवर्षीच्या ऑडिटमध्ये ७५४ विमानांपैकी तब्बल ३७७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा संसदीय समितीने केला आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करताय तर पुढचा धोका ओळखून प्रवास करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा: सावधान ..! भारतातील CCTV कॅमेऱ्यांचे ‘लाईव्ह फुटेज’ थेट सरहद्दीपार पाकिस्तानात

विमान कंपन्यांची यादी

या अहवालात तांत्रिक बिघाड होत असलेलया विमान कंपन्यांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत इंडिगो एअरलाईन्स सर्वोच्च स्थानी आहे. इंडिगोच्या ४०५ विमानांच्या ऑडिटमध्ये १४८ विमानांत तांत्रिक बिघाड झाला आहे. तसेच एअर-इंडियाची स्थितीही मोठी गंभीर आहे. एअर-इंडियाच्या १६६ पैकी १३७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या १०१ पैकी ५४ विमानांमध्येही दोष आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

वैमानिकांच्या प्रशिक्षणात उणिवाही

बोईंग ७८७ आणि ७७७ विमानांच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणात उणिवाही असल्याचे समोर आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये अपुरे केबिन क्रू आणि ‘फ्लाइट ड्युटी टाईम’च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. एअर इंडियाला सुरक्षा नियमांच्या उल्लंघनासाठी डीजीसीएने ९ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. २०२५ च्या अखेरपर्यंत विविध एअरलाईन्सना एकूण १९ नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये कॉकपिटमध्ये अनधिकृत प्रवेश आणि कालबाह्य आपत्कालीन उपकरणांचा वापर यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे.

डीजीसीएची यंत्रणाही कुचकामी

अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे वाढत्या विमान वाहतुकीवर देखरेख ठेवणे कठीण होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुधारणा करण्याची आणि देखरेख यंत्रणा अधिक कडक करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामुळे डीजीसीएची यंत्रणाही कुचकामी ठरत आहे.

विमान तांत्रिक बिघाडाची प्रमुख कारणे

देखभालीचा अभाव: विमानाची वेळेवर देखभाल न करणे किंवा तपासणीत त्रुटी राहणे, हे मुख्य कारण आहे.
सुट्या भागांची झीज: दीर्घकाळ वापरल्यामुळे इंजिनचे पंखे, सेन्सर्स, किंवा लँडिंग गिअरचे भाग निकामी होतात.
इंधन प्रणालीतील दोष: इंधन गळती किंवा इंधनामध्ये अशुद्धता यामुळे इंजिनमध्ये गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
इलेक्ट्रॉनिक-सेन्सर त्रुटी: नेव्हिगेशन किंवा सुरक्षेसाठी लागणारे सेन्सर चुकीची माहिती देतात.
मानवी त्रुटी : देखभालीदरम्यान तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका.
खराब हवामान: वादळ किंवा अति थंडीमुळे उपकरणांवर ताण येऊन बिघाड होऊ शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts