Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भाजप नेत्या चा काळा कारनामा! स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, ९ मुलींना अटक
Top News

भाजप नेत्या चा काळा कारनामा! स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, ९ मुलींना अटक

Sex racket at BJP leader's flat

Sex racket at BJP leader’s flat : भाजप नेत्या फ्लॅटवर स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे नेत्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी छापेमारी करत 9 मुली आणि 4 मुलांना अटक केली आहे. एवढंच नाही तर, पोलिसांना तपासात कचऱ्याच्या डब्यातून नको ते साहित्या मिळाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

धक्कायदायक गोष्ट म्हणजे, भाजप नेत्या फ्लॅटवर छापा टाकल्यानंतर पोलिसांना इतर ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची देखील माहिती मिळाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. छापा मारण्यात आलेला फ्लॅट भाजप नेत्या शालिनी यादव यांचे पती अरुण यादव यांच्या नावावर आहे. त्यांनी हा फ्लॅट भाड्याने दिलेला असल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित फ्लॅट वाराणसी येथील सिगर भागात आहे.

हेही वाचा – राजकारणात मोठी खळबळ! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती; आमदार रत्नाकर गुट्टे यांचा दावा

स्पेशल ऑपरेशन करत पोलिसांनी 9 मुली आणि 4 मुलांना अटक केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटवर स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप पोलिसांना देण्यात आली. तेव्हा स्पेशल ऑपरेशन करत पोलिसांनी 9 मुली आणि 4 मुलांना अटक करण्यात आली आहे.मुली आजपासच्या भागातून यायच्या आणि फ्लॅटमध्ये आक्षेपार्ह वस्तू, रजिस्टर आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलं आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू असून हा फ्लॅट वाराणसी विकास प्राधिकरणाच्या शक्ती शिखा अपार्टमेंट क्रमांक 112 मध्ये आहे.

महमूरगंज, भेलुपूर आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील स्पा सेंटरवर छापेमारी

या कारवाईनंतर, पोलिसांनी महमूरगंज, भेलुपूर आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील स्पा सेंटरसह जवळच्या इतर स्पा सेंटरवर छापे टाकले. फ्लॅटच्या कचऱ्याच्या डब्यातही गुन्हेगारी साहित्य आढळून आल्याने रॅकेटचा आणखी उलगडा झाला. यामुळे फ्लॅट मालक शालिनी यादव यांचा राजकारणातील प्रवास देखील चर्चेत आला आहे.

शालिनी यादव यांची राजकीय कारकिर्द..

शालिनी यादव या 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर महापौरपदाची निवडणूक लढवली आणि दुसऱ्या क्रमांकावर आल्या. 2019 मध्ये, त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी जवळपास 2 लाख मतं मिळवून त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यानंतर 24 जुलै 2023 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts