• Home
  • राजकारण
  • राजकारणात मोठी खळबळ! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती; आमदार रत्नाकर गुट्टे यांचा दावा
Top News

राजकारणात मोठी खळबळ! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती; आमदार रत्नाकर गुट्टे यांचा दावा

Ratnakar Gutte And Dhananjay Munde

Dhananjay Munde Murder Claim : राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांची काही वर्षांपूर्वीच हत्या झाली असती पण ते वाचले, असा दावा त्यांनी केला आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी इंदोर येथे धनंजय मुंडे यांचा खून होणार होता मात्र, दिवंगत भय्यूजी महाराज यांच्यामुळे ते वाचलं असल्याचें त्यांनी आपल्या एका भाषणात म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे गंगाखेड इथे गेले होते. यावेळी मुंडे यांनी आमदार गुट्टे यांच्यावर सडकून टीका केली होती. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर १ हजार ६०० कोटींचे कर्ज उचललं असल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता. त्यानंतर गुट्टे यांनी त्यांच्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा – तळ कोकणात भाजपाच्या थैल्यांना शिंदे गटाकडून बॅगेने उत्तर; संजय राऊत

तुम्ही सुरुवात केली मी शेवट करणार..

मुंडे यांनी प्रतिउत्तर देताना आमदार गुट्टे म्हणाले, सुरुवात तुम्ही केली पण आता शेवट मी करणार आहे. तुम्ही मला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याची प्रयत्न केला. मुंडे यांनी माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली आणि त्यांनी किती ताकद दिली हे देखील आपल्याला माहिती असल्याचं सांगितलं. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील जमता हीच माझं बुलेटप्रुफ जॅकेट आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलो आणि तुमचा मनसुबा इथल्या जनतेने उधळून लावला. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनू भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.

रत्नाकर गुट्टे यांचा धनंजय मुंडेंना सवाल?

पुढे बोलताना गुट्टे म्हणाले, धनू भाऊ मागील काही वर्षात तुमच्यावर बरेच आरोप झाले. प्रत्येक जण तुमच्या विरोधात बोलत होता. एवढेच काय तुमच्याच पक्षातील लोक तुमच्यावर बोलत आहेत. पण मी तुमच्या विरोधात एकही प्र शब्द काढला नाही. पण आता तुम्ही स्वतःहून गंगाखेडला आलात आणि माझ्या विरोधात बोललात त्यामुळे आता मी तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सर्वच बाहेर काढणार आहे. जगमित्र साखर कारखान्यासाठी तुम्ही शेअर्सच्या रूपाने गोळा केलेले पैसे काय केले तुम्ही देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या असे म्हणत रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज राहिला असेल तर राजकारणातून संन्यास घेईल

गंगाखेड साखर कारखान्यासाठी कारखान्याने 106 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते आणि ते कर्ज देखील कारखान्याने फेडले आहे. गंगाखेड शुगर हा कारखाना विक्री झालेला आहे शेतकऱ्यांच्या नावावर कसल्याही प्रकारचा कर्ज कारखान्याने शिल्लक ठेवलं नाही. शेतकऱ्यांच्या नावावर जर कर्ज राहिला असेल तर आत्ता रत्नाकर गुट्टे हा राजकारणातून संन्यास घेईल.

राजकारणातून संन्यास घेणार का?  की राजीनामा देणार?

काही शेतकऱ्यांच्या सिबिल चा प्रॉब्लेम झाला आहे, त्यासाठी देखील मी त्या शेतकऱ्यांना कोर्टामध्ये पाठवला आहे त्यांचे सिबिल देखील क्लिअर करण्याचं काम मी करणार आहे. धनु भाऊ हे जर खर असेल तर मग तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार का तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणार का? असा सवाल देखील यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts